Gujarat: कारखान्याची भींत कोसळून 12 जण ठार; पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबीयास प्रत्येकी 2 लाख, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर
कारखाण्याची भींत कोसळून ( Salt Factory Wall Collapse) घडलेल्या या घटनेत 12 मजूर ठार झाले आहेत. तर इतर 15 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुजरात (Gujarat) राज्यातील मोरबी जिल्ह्यात (Morbi District) असलेल्या हलवाड जीआईडीसी (GIDC) परिसरात असलेल्या एका कारखान्यात भीषण घटना घडली आहे. कारखाण्याची भींत कोसळून ( Salt Factory Wall Collapse) घडलेल्या या घटनेत 12 मजूर ठार झाले आहेत. तर इतर 15 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी (18 मे) दुपारी 12 वाजणेच्या सुमारास घडली. भींत नेमकी कोणत्या कारणामुळे पडली याचा पोलीस शोध घेत आहेत. तर मदत व बचाव पथकाच्या सहाय्याने मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ही घटना सागर केम फूड इंडस्ट्रीजमध्ये झाली. ही इंडस्ट्री जीआडीसीमध्ये भूखंड क्रमांक 61,62,63 वर उभी आहे. अधिकाऱ्यांनी म्हले की, ही कंपनी रासायनिक उत्पादनांसह खाद्य उद्पानेही तयार करते. (हेही वाचा, Bombay Serial Blasts: मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना गुजरात एटीएसकडून अटक)
ट्विट
मोरबी जिल्हा प्रशासनाने दावा केला आहे की, 90% बचाव कार्य पूर्ण झाले आहे. गुजरातचे कामगार आणि रोजगार मंत्री बृजेश मेरजा यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत म्हटले आहे की, दुपारी 12 वाजणेच्या सुमारास जीआडीसी स्थित सागर सॉल्ट फॅक्ट्रीत एक भींत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, मोरबी येथे भींत कोसळल्याने घडलेली घटना अत्यंत दु:ख दायक आहे. अशा परिस्थितीत मृतांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खामध्ये मी सहभागी आहे. जखमींना लवकर आराम मिळो. स्थानिक अधिकारी आवश्यक ती सर्व मदत करत आहेत.