112 India Mobile App: महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने लॉन्च केला '112 India' मोबाईल अॅप; काय आहेत याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

या सिस्टमद्वारे केवळ 112 हा एकमेव नंबर डायल करुन महिला मदत मागू शकतात.

Mobile Apps | Representational Image (Photo Credits: PTI)

केंद्र सरकारने महिल्यांच्या सुरक्षेसाठी 112 इमरजन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम (Emergency Response Support System) लॉन्च केली आहे. या सिस्टमद्वारे केवळ 112 हा एकमेव नंबर डायल करुन महिला मदत मागू शकतात. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी (Union Minister of Women and Child Development Smriti Irani) यांनी ही माहिती काल (शुक्रवार. 18 सप्टेंबर) लोकसभेत दिली.

ERSS तुम्ही कोणत्याही स्मार्टफोनमधून 112 भारतीय मोबाईल अॅप अॅक्सेस करु शकता. कायदा आणि सुव्यवस्था पाळणे, नागरिक आणि त्यांच्या मालमत्तेची रक्षा करणे आणि त्यासोबत महिलांसाठी सुरक्षा प्रदान करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराबाबत राज्य सरकारने पोलिसांना जागृत करणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत विविध कोर्सेची ट्रेनिंग केंद्र सरकारकडून पोलिसांना वारंवार दिली जात आहे.

112 India अॅपची वैशिष्ट्ये:   

112 India हा अॅप इंस्टाल करताना प्रथम तुम्हाला तुमचे राज्य आणि मोबाईल नंबर इंस्टाल करावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे तुमची माहिती भरुन या अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करु शकता. या अॅपमध्ये युजर्संना 112 पोलिस, फायर, मेडिकल आणि अदर्स (others) असे चार पर्याय दिसतील. या पर्यायांवर क्लिक केल्यावर तुमचे लोकेशन ट्रेस होऊन तुम्हाला तातडीने मदत मिळू शकेल. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही वन टॅब सर्व्हिस आहे. या पर्यांयावर फक्त क्लिक केल्याने सिग्नल यंत्रणांना पाठवला जातो आणि समोरुन तुम्हाला मदतीसाठी फोन येतो. तसंच एखाद्या ठिकाणी आग लागली तर फायर या पर्यायावर क्लिक केल्याने तुम्हाला मदत मिळेल. वैद्यकीय मदतीसाठी तुम्हाला मेडिकल या पर्यायाची निवड करावी लागेल. तसंच या अॅपमद्वारै स्वयंसेवयक म्हणून देखील तुम्ही काम करु शकता.

दरम्यान, महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांना ट्रेनिंग केंद्र सरकारकडून वारंवार देण्यात येते. महिलांविरुद्ध होणारा हिंसाचार रोखण्यासाठी निर्भया फंडच्या मदतीने 684 सेंटर्स सरकारद्वारे उभे करण्यात आले आहेत. Annexure-I मध्ये तुम्हाला राज्यस्तरावरील वन स्टॉप सेंटर्सची माहिती मिळेल.