Google Doodle Today: क्लासिक पॉपकॉर्न चा जन्म साजरा करत आहे गुगल, डूडलद्वारे इंटरेक्टिव गेम समर्पित
त्यामुळे आज गुगलने पॉपकॉर्न डूडल गेम साजरी केले आहे.
Google Doodle : पॉपकॉर्न हा अनेकांचा वेगवेगळ्या कारणाने सोबती झाला आहे. कधी मूव्ही पाहताना, कधी रात्री उशीराचा स्नॅन म्हणून पॉपकॉर्नला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आज गुगलने पॉपकॉर्न डूडल गेम साजरी केले आहे. ज्यात तूम्ही एकटे किंवा तुमचा एक संघ तयार करून त्यात खेळू शकता. जगभरात पॉपकॉर्नला इतकी पसंती मिळाली आहे की, थायलंडमध्ये 2020 मध्ये याच दिवशी आजपर्यंतची सर्वात मोठी पॉपकॉर्न मशीन तयार करण्यात आली होती. (हेही वाचा:Archery Google Doodle: ओलंपिक स्पोर्ट आर्चरीसाठी गूगलकडून खास डूडल, येथे पाहा)
कसे खेळू शकता
- तुमचा क्रोम ब्राउझर उघडा आणि पॉपकॉर्न साजरा करत असलेल्या डूडलवर क्लिक करा.
- गेम मेकॅनिक्सचे स्पष्टीकरण देणाऱ्या संक्षिप्त परिचयाने तुमचे स्वागत केले जाईल.
- एकट्या खेळाडूंसाठी, "सोलो मोड" निवडा आणि स्वतःला आव्हान द्या. तुम्ही मित्रांसोबत खेळत असल्यास, तुमच्या गटासाठी "स्क्वॉड मोड" निवडा.
पॉपकॉर्नची उत्पत्ती 16 व्या दशकाच्या सुरुवातीची आहे. मेसोअमेरिकन संस्कृतींमध्ये मका हे एक व्यापक पीक म्हणून घेतले जात होते. त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे पॉपकॉर्न बनवले गेले. 1800 च्या दशकात युनायटेड स्टेट्समध्ये मकापासून तयार केलेले खाद्यपदार्थ मुख्य स्नॅक बनला. पॉपकॉर्न नाश्ता म्हणून प्रथम दुधासह खाल्ला गेला. 1890 च्या दशकात पहिल्या पॉपकॉर्न मेकरचा शोध लावला गेला, ज्यामुळे अधिक लोकांना कुरकुरीत पॉपकॉर्नचा आनंद घेता आला.
मका या पीकापासून तयार केलेले पॉपकॉर्न आधीच्या काळात इतके फेमस होते की जत्रेतही त्याची मोठमोठी दुकाने लागायची. जगभरात पॉपकॉर्नच्या पॉप्युलरिटीमध्ये स्फोट झाला आहे. विविध देश आणि प्रदेशांकडे आता स्वतःचे चवदार पॉपकॉर्न आहेत. ब्राझीलमधील पिपोका, जपानमधील नोरी-टॉपड पॉपकॉर्न, मध्य पूर्वेतील झाटार पॉपकॉर्न, कॅनडामध्ये मॅपल पॉपकॉर्न अशी मोठी यादी आहे. कॅरॅमल-पॉपकॉर्न, केटल-पॉपकॉर्न, बटर पॉपकॉर्न, सॉल्टी पॉपकॉर्न अशा अनेक प्रकारचे पॉपकॉर्न आजकाल बाजारात मिळतात.