Gold & Silver Rate Today: सोने- चांदी चा भाव वधारला; मुंबई, दिल्ली, कोलकाता सहित प्रमुख शहरातील आजचे दर जाणून घ्या
सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आजचे प्रति 10 ग्राम सोन्याचे दर हे मुंबई मध्ये 41,633 , दिल्ली मध्ये 41,959, कोलकाता येथे 42,220 असे आहेत. तर देशभरात चांदीचे प्रति किलो दर हे 50,800 इतके आहेत.
सोने चांदी विक्रीचा व्यवसाय हा साधारणतः सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पहिला जातो मात्र मागील काही काळात आंतरराष्ट्रीय बाजारात ओढवलेली मंदी आणि जगभरावर पसरलेले कोरोना व्हायरसची संकट यामुळे या व्यवसायात सुद्धा सतत चढउतार पाहायला मिळत आहेत. मागील काही आठवड्यांपूर्वी सोन्याचे दर (Gold Rate) हे 45 हजाराच्या पार गेले होते तर त्यानंतर काहीच दिवसात या दरात गंभीर पडझड होऊन अवघ्या दहाच दिवसात 5 हजाराहून अधिक घसरण झाली होती, आता मात्र दोन दिवसांपासून पुन्हा हे दर स्थिरावत आहेत किंबहुना सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आजचे प्रति 10 ग्राम सोन्याचे दर हे मुंबई मध्ये 41,633 , दिल्ली मध्ये 41,959, कोलकाता येथे 42,220 असे आहेत. तर देशभरात चांदीचे प्रति किलो दर (Silver Rate) हे 50,800 इतके आहेत. Corona In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 15 रुग्ण; लागण झालेल्यांचा एकूण आकडा 89 वर
देशातील प्रमुख शहरातील सोने चांदी दर
शहर 24 कॅरेट सोने 10 ग्राम 22 कॅरेट सोने 10 ग्राम चांदी (प्रति किलो)
मुंबई 41,633 39,653 50,800
दिल्ली 41,959 39,959 50,800
कोलकाता 42,220 40,180 50,800
चेन्नई 41,690 39,670 50,800
हैदराबाद 41,670 39,714 50,800
दरम्यान, सोन्या चांदी इतकाच मोठा फटका शेअर मार्केटला सुद्धा बसला आहे, आज शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये कमालीची घसरण झाली परिणामी लोअर सर्किट लागू करून 45 मिनिटे ट्रेडिंग बंद ठेवण्यात आले होते. यांनतर पुन्हा शेअर बाजार उघडल्यावरही सेन्सेक्स मध्ये 3,185.84 पॉईंट ची घसरण होऊन 26,730.12 इतका उतरला आहे, तर Nifty सुद्धा 923.95 पॉईंट खाली येऊन 7,821.50 वर पोहचला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)