Gold Rate on 1st December: सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या मुंबई, पुणे, नवी दिल्ली, चेन्नईसह महत्त्वाच्या शहरातील आजचे भाव

त्यामुळे तुळशीची लग्न संपताच आलेल्या शुभमुहूर्तावर लग्नसराई सुरु झाली. अशातच सोन्याचे भाव कमी होण ग्राहकांची अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Gold Rate | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Gold Rate Today: आज वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना सुरु झाला असून आर्थिक व्यवहारांसंबंधी आज अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. त्यात एक दिलासादायक बातमी म्हणजे सोन्याचे दर मागील 2-3 दिवसांपासून कमी झालेले चित्र दिसत आहे. त्यात आजही सोन्याच्या थोड्या बहुत प्रमाणात घसरण झाली आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold Rate) दर प्रतितोळा 48,240 रुपये इतका झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Rate) प्रति तोळा 47,240 रुपये इतका झाला आहे. लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर घसरणे हे ग्राहकांसाठी दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात सोन्याचा भाव हे 50 हजार ते 55 हजाराच्या घरात गेले होते.

लॉकडाऊन यंदा अनेक शुभकार्य विशेषत: लग्न रखडली. त्यामुळे तुळशीची लग्न संपताच आलेल्या शुभमुहूर्तावर लग्नसराई सुरु झाली. अशातच सोन्याचे भाव कमी होण ग्राहकांची अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मुंबईत चांदीचा दर 59,100 रुपये प्रति किलो असा आहे. हेदेखील वाचा- Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण, जाणून घ्या मुंबई, पुणे, नवी दिल्लीसह या महत्त्वाचे शहरांतील आजचा भाव

जाणून घ्या मुंबईसह अन्य महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे आजचे दर (ही दर goodsreturn.in या संकेतस्थळावरून देण्यात आली आहे.

शहर 24 कॅरेट/प्रतितोळा 22 कॅरेट/प्रतितोळा
मुंबई 48,240 रुपये 47,240 रुपये
पुणे 48,240 रुपये 47,240 रुपये
चेन्नई 49,300 रुपये 45,190 रुपये
हैदराबाद 48,764 रुपये 44,700 रुपये
नवी दिल्ली 51,100 रुपये 46,850 रुपये
बंगळूरू 48,764 रुपये 44,700 रुपये

वर सांगितलेल्या सोन्याच्या दरात सराफा दुकानामध्ये थोडा बदल असू शकतो. तसेच सोनेच्या दागिन्यांच्या खरेदीमध्ये घडणावळ आणि टॅक्स हा वर खर्च असतो त्यामुळे यंदा सोनं खरेदी करताना हे सारे खर्च लक्षात घेऊन खरेदीचे प्लॅन बनवा.थोडक्यात सोन्याच्या कमी झालेल्या दरामुळे वर्षाचा शेवट नागरिकांसाठी गोड होतोय. मात्र या शेवटच्या महिनाअखेरीस सोन्याचे दर कायम राहतात की कमी होतात की वाढतात हे येत्या काही दिवसातच कळेल.