Dog Ban in Goa: गोव्यात सरकार घालणार कुत्र्यांच्या काही प्रजातींवर बंदी; CM Pramod Sawant यांची घोषणा

स्टॅटिक पॉइंट लसीकरण मोहिमेचा हेतू राज्यातील प्रत्येक कुत्र्याला लसीकरण करण्याचा आहे असेही सावंत म्हणाले आहेत.

Dog and woman | Representational image (Photo Credits: pxhere)

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant0 यांनी राज्यात माणसांवर हल्ला करणार्‍या कुत्र्यांच्या काही जातींवर बंदी घालणार असल्याची माहिती दिली आहे. 'लोकांकडे कुत्रे असतात पण ते त्यांना योग्य वेळी लसी देत नाहीत'. 2 महिन्यांपूर्वी नॉर्थ गोवा च्या तळेयीगाव मध्ये एक प्रकार घडला. ज्यात कुत्र्याने गेटवरून उडी मारून मुलावर हल्ला केला. त्या मुलाला उपचारांसाठी 4-5 दिवस ठेवावे लागले होते. गोव्यामध्ये Rabies Mukt Goa Static Point Vaccination Campaign’लॉन्च केल्यानंतर त्यांनी ही काही कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.

कुत्र्यांमुळे काही दुचाकींचे देखील अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्याची गरज आहे. गोवा रेबिजमुक्त करण्यासाठी आता लोकांचा सहभाग देखील आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे. मुंबई 'Rabies-Free' होणार? शहरातील भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी झाला करार; प्रतिवर्षी लाखभर कुत्र्यांना लस देण्याचा मानस .

"स्टॅटिक पॉइंट लसीकरण मोहिमेचा हेतू राज्यातील प्रत्येक कुत्र्याला लसीकरण करण्याचा आहे ज्यामध्ये लोकांना मिशन रेबीजच्या संबंधितांना सहकार्य करावे लागेल जे घरोघरी भेट देतील," ते म्हणाले. त्यांनी लोकांना त्यांच्या कुत्र्यांना लसीकरण करण्याचे आवाहन केले. "नियमितपणे लसीकरण करून बाहेरील राज्यातून कुत्र्यांना आणताना खबरदारी घ्या," ते म्हणाले.

“आम्ही देशातील पहिले रेबीजमुक्त राज्य झालो असलो तरी आमचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नाही. गोव्यातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला पुढील पावले उचलावी लागतील. कुत्रा चावण्याच्या घटना आणि अपघातात वाढ झाली आहे,” ते म्हणाले.