HIV Test लग्नाच्या नोंदणीसाठी बंधनकारक? गोवा सरकार नवा नियम अंमलात आणण्याच्या विचारात

येत्या काळात लग्न करायचे झाल्यास त्याआधी HIV चाचणी करणे बंधनकारक करण्याचा गोवा सरकारचा विचार आहे,यासाठी सध्या सर्व कायदेशीर बाबींची तपासणी होत आहे.

Goa Government To Make HIV Test Compulsory Before Marriage (Photo Credits: Facebook, File Image)

पणजी: येत्या काळात गोवा सरकारच्या (Goa Government) नव्या नियमानुसार, गोवेकर मंडळींना लग्न करायचे झाल्यास त्याआधी HIV चाचणी करणे बंधनकारक असू शकते. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी या शक्येतची पुष्टी करत, देशातील HIV चे वाढते प्रमाण पाहता,हा कायदा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे म्हंटले आहे, यासाठी सध्या सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात असून येत्या 15 जुलै पासून सुरु होणाऱ्या गोव्याच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session)  हा नवा कायदा पास केला जाऊ शकतो. धक्कादायक : HIV बाधित राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

यानुसार, लग्नाची नोंदणी करण्याआधी पती-पत्नी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करून घेणं बंधनकारक करण्याचं विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर होऊ शकतं. गोवा येथे मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात. देहव्यापाराचे प्रमाणही या राज्यात अधिक आहे. त्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. याचाच विचार करून लग्नाची नोंदणी करण्यासाठी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे.

चमत्कार: जगातील दुसरा HIV बाधित व्यक्ती झाला बरा, वाचा कसे

एचआयव्ही सोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणंही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे. 'गोवासारख्या पुरोगामी राज्यामध्ये या दोन्ही चाचण्या लग्नाआधी बंधनकारक करणं गरजेचं आहे. मी या कायद्याचे 100 टक्के समर्थन करीन' असं विश्वजीत राणे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 2006 मध्ये, HIV टेस्ट बंधनकारक करण्यासाठी तद्कालीन आरोग्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी सुद्धा प्रस्ताव मांडला होता, ज्यानुसार गोवा विधानसभेत या कायद्याला मंजुरी ही देण्यात आली होती. मात्र त्यावेळी या निर्णयाला पुरेसं यश मिळालं नव्हतं, आता जर का पुन्हा हा निर्णय घेण्यात आलं अंतर गोवेकर याला स्वीकारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif