खासगी दौऱ्यात असे असतात काँग्रेस अध्यक्ष; 'कॅप्टन कूल' राहुल गांधी यांचा न पाहिलेला अंदाज
कॅप्टन कुल राहुल गांधी यांचे असेच काहीसे रुप गोवा (Goa) येथे पाहायला मिळाले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Congress President Rahul Gandhi) हे राजकारणातले कॅप्टन कूल (Captain Cool in politics) म्हणून ओळखले जातात. विरोधकांनी कितीही आक्रमक भाषा वापरली, हिनवले, पप्पू अशी संभावना केली तरी राहुल गांधी यांनी आपली पातळी कधीच सोडली नाही. आजवर तुम्ही त्यांना नेहमीच पाढऱ्या रंगाच्या सलवार कुर्त्यामध्ये पाहिले असेल. विरोधकांना अत्यंत संयत आणि नेमके प्रश्न विचारणारे राहुल गांधी हे जेव्हा अनौपचारिक असतात. त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासोबत खासगी दौऱ्यावर असतात तेव्हा ते राजकीय नेते नसतात तर, एक सर्वसामान्य नागरिक आणि एक कर्तव्यदक्ष मुलगा असतात. कॅप्टन कुल राहुल गांधी यांचे असेच काहीसे रुप गोवा (Goa) येथे पाहायला मिळाले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी नुकतेच गोवा दौऱ्यावर आले होते. हा त्यांचा खासगी दौरा होता.
हिवाळी अधिवेश संपल्यावर राहुल गांधी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांना घेऊन गोव्याला आले होते. 26 जानेवारी या दिवशी खासगी विमानाने ते गोव्याला आले. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यासोबत या वेळी एकही सुरक्षा रक्षक पाहायला मिळाला नाही. अत्यंत सर्वासामान्य नागरिकाप्रमाणे ते गोव्यात आले. निळा टी-शर्ट परिधान करुन दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध फिशरमॅन्स वॉर्फ रेस्तराँमध्ये भोजनाचा आनंद घेणाऱ्या राहुल गांधी यांना पाहून अनेकांना धक्का बसला. त्यांना पाहून अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेण्याचा आनंदही लूटला.
गोव्यातील स्थानिक डेंटिस्ट रचना फर्नांडिसआणि सोनिया गांधी यांचीही गोव्यातील रेस्तराँमध्ये अशीच अचानक भेट झाली. त्यांनी एकमेकींसबत गप्पा मारल्या. या वेळी त्यांनी राहुल यांना सोबत सेल्फी काढण्याबाबत विचारले असता 'जेवणाचे बिल देतो आणि त्यानंतर तुमच्याशी निवांत सेल्फी काढतो', असे ते म्हणाल्याचे फर्नांडिससांगतात. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना फर्नांडिस यांनी सांगितले की, जेवणाचे बिल दिल्यानंतर राहुल यांनी खरोखरच माझ्यासोबत फोटो काढला. ते राजकारणातील एक चंगले आणि नम्र गृहस्थ आहेत. त्यानंतर हा फोटो फर्नांडिस यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यासोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, 'राहुल यांचा आकर्षक आणि नम्र स्वभाव पाहून मला आश्चर्य वाटले.' (हेही वाचा, बहीण प्रियंका गांधी यांना बंधू राहुल गांधी देणार गिफ्ट; लोकसभा निवडणुकीत घडणार चमत्कार?)
दरम्यान, सोनिया आणि राहुल यांचा हा खासगी दौरा होता. ते एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये उतरले होते. त्याच्यासोबत पक्षीय बैठक किंवा कोणताही कार्यक्रम ठरला नाही, असे काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटले आहे.