Goa Congress: 'भारत जोडो'ला, 'काँग्रेस फोडो'ने प्रत्युत्तर; गोव्यात विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेसचे 8 आमदार भाजपच्या वाटेवर, आजच पक्षप्रवेशाची शक्यता
दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजप ( BJP) गोवा (Goa) राज्यात 'काँग्रेस फोडो' (Break the Congress) मोहीम राबवत आहे.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका बाजूला 'भारत जोडो' यात्रा (Bharat Jodo Yatra) काढत आहेत. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजप ( BJP) गोवा (Goa) राज्यात 'काँग्रेस फोडो' (Break the Congress) मोहीम राबवत आहे. भाजप नेते सदानंत शेट तानवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील काँग्रेसचे (Goa Congress) आठ आमदार सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.काँग्रेसकडे सध्या 11 तर भाजपकडे 20 आमदार आहेत. चाळी सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत 21 हा बहुमताचा आकडा आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलिलाह लोगो, राजेश फलदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेराआणि रुडॉल्फ फर्नांडिस हे काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, याच वर्षी जुलै महिन्यात, काँग्रेसने म्हटले होते की मायकेल लोबो आणि दिगंबर कामत हे गोव्यातील त्यांचे दोन दिग्गज नेते आहेत. काँग्रेसमधील पक्षांतराला ते आळाघालून भाजपमधीलच काही आमदार काँग्रेसमध्ये आणतील. पण प्रत्यक्षात आता उलटे घडताना दिसत आहे. (हेही वाचा, ब्रिटनच्या गृहमंत्री Suella Braverman यांच्या वडिलांच्या गोव्यातील मालमत्तांवर बेकायदेशीर कब्जा, SIT सुरु केला तपास)
पक्षाने म्हटले होते की, पक्षांतर विरोधी कायदा टाळण्यासाठी भाजपला काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार एकत्र करायचे होते, परंतु ते अयशस्वी झाले. निष्ठा बदलण्यासाठी भाजपने आपल्या आमदारांना पैशांची ऑफर दिल्याचे त्यात म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसने असेही म्हटले होते की, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार होणारी कारवाई टाळण्यासाठी भाजपला काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडायचे होते. परंतु ते अयशस्वी झाले. निष्ठा बदलण्यासाठी भाजपने आपल्या आमदारांना पैशांची ऑफर दिल्याचा आरोपही काँग्रेसने केला. दरम्यान, पाठिमागील काही काळापासून लोबो, कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डेलियालाह लोबो यांच्यासह काँग्रेसचे पाच संपर्काच्या बाहेर होते.