'मिग 29के' विमानाचा ड्रॉप टॅंक कोसळला, गोवा विमानतळाची वाहतूक स्थगित

यामुळे विमानतळावरील वाहतूक पुढील दोन तासांसाठी बंद असणार आहे.

Mig 29k Drop Tank Catches Fire (Photo Credits: Twitter/ANI)

मिग 29 के ( Mig 29k) या लढाऊ विमानाचा ड्रॉप टॅंक कोसळल्याने गोवा विमानतळाजवळ (Goa Airport) आग लागली आहे. यामुळे विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. याबाबत नौदलाच्या प्रवक्त्यांनी माहिती देत लवकरात लवकर आगीवर नियंत्रण आणून विमानसेवा पुन्हा पुर्वव्रत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हंटले आहे. दाभोली विमानतळावरून उड्डाण घेताच मिग 29 के या लढाऊ विमानाची इंधन टाकी खाली कोसळली हवेच्या दाबामुळे लगेचच या टाकीने पेट घेतला. आग लागली असली तरी सुदैवाने मिग 29के विमानाला व वैमानिकांना कोणतीही हानी झालेली नाही.

ANI ट्विट

आगीवर नियंत्रण येताच विमानसेवा सुरु करण्यात येईल मात्र तूर्तास पुढील दोन तासांसाठी गोवा विमानतळ बंद ठेवण्यात आल्याचे देखील नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या विमानाची वाहतूक देखील उशिराने होणार आहे.



संबंधित बातम्या