Ganpati Utsav 2021: पीओपीच्या गणेशमुर्ती खरेदी करणाऱ्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा- गोवा मंत्री निलेश कॅबरल
त्यानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्त्यांवर गोव्यात बंदी घालण्यात आली आहे.
Ganpati Utsav 2021: गोवा राज्याचे पर्यावरण मंत्री नीलेश कॅबरल (Nilesh Cabral) यांनी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सापूर्वी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्त्यांवर गोव्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार विक्रेता आणि ग्राहक यांना पीओपी गणेशमुर्त्यांसाठी मोठा भुर्दंडासह तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.(IRCTC कडून महिला ट्रेन यात्रींसाठी रक्षाबंधन सणाचं गिफ्ट; Tejas Express ने प्रवास करणार्यांना स्पेशल कॅशबॅक ऑफर)
कॅबरल यांनी सचिवालयात मीडियाला असे म्हटले की, आम्ही कठोर कार्यवाही करु. हा आदेश गोवा (राज्य) प्रदुषण नियंत्रण बोर्ड, पोलीस विभाग, प्रशासन, कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर यांच्याकडून लागू करण्यात आला आहे. हा कायदा पूर्णपणे लागू केला जाणार आहे. कारण पीओपीचे विघटन होत नाही. त्यामुळे पीओपी हा एक प्रमुख पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो.
मंत्र्यांनी पुढे असे ही म्हटले की, यावेळी कठोर कार्यवाही केली जाणार आहे. पीओपीच्या गणेशमुर्त्यांच्या विक्रीवर बंदी घातली जाणार असून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हे थोडे कठीण होणार आहे. परंतु पीओपीच्या गणेशमुर्ती खरेदी केल्यास कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असे ही निलेश कॅबरल यांनी स्पष्ट केले आहे.(India Independence Day 2021: 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी केली गती शक्ती योजनेची घोषणा, तरुणांना रोजगारासाठी 100 लाख कोटींची होणार तरतूद)
तसेच गोव्यात पीओपी ऐवजी पारंपारिक मातीच्या मुर्त्या विक्री करण्यासाठी बाजारात उपलब्ध राहतील. मात्र पीओपीच्या मुर्त्यांवर बंदी असणार आहे. कारण यामधून निघणारे सल्फर, फॉस्फरस, जिप्सम आणि मॅग्नेशिअमसह शिसांपासून तयार करण्यात आलेले रंग हे हळूहळू विघटित होत जातात. या सर्व गोष्टी नदी, नाल्यांमध्ये मिसळल्यास त्यामुळे पाणी विषारी होते. गोव्यात गणेश चतुर्थी हा एक महत्वपू्र्ण सण असून तो यंदा येत्या 10 सप्टेंबरपासून साजरा केला जाणार आहे.