Uttar Pradesh: एकेकाळी होता डाकू, 23 वर्षांनी तुरुंगातून सुटताच देवाला अर्पण केली 101 किलोची घंटा, देशभर चर्चा

बाहेर येताच त्याने उत्तर प्रदेशातील एका मंदिरात तब्बल 101 किलो वजनाजी घंटा देवाला अर्पण केली. तरुण पिढीला गुन्हेगारीपासून दूर राहण्याचे अवाहन करण्यासाठी त्याने चक्क अशा प्रकारचे दान दिले आहे.

Bell | Representational image (Photo Credits: pxhere)

Bareilly Central Jail: आपल्या देशात देवांची कमी नाही. त्यामुळे जेवढे देव तेवढी मंदिरे आणि तितकेच त्याचे अगणीत भक्त. जेवढे भक्त तेवढे दानधर्म आणि मग मंदिरांची वाढणारी संपत्ती हा न संपणारा विषय. अनेकदा भक्तांनी अर्पन केलेले दान नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. महाराष्ट्रापूरतं बोलाचं झालं तर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डी साईबाबा देवस्थान, पंढरपूरचा विठोबा असा विविध मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या दानाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर होतात. अशीच एका भक्ताने देवाला अर्पन केलेल्या दानाची देशभरात चर्चा सुरु आहे. कहाणी आहे उत्तरप्रदेशातील बरेली मध्यवर्ती कारागृहातून तब्बल 23 वर्षांनी बाहेर पडलेल्या एका डाकूची. शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर त्याला डाकू म्हणायचे किंवा नाही याबाबत मतमतांतरे होतील. पण, सध्या चर्चा आहे ती त्याने दान केलेल्या दानाची.

नज्जू उर्फ रज्जू (Najju alias Rajju) असे नाव असलेला हा डाकू 23 वर्षांनी तुरुंगाबाहेर आला. बाहेर येताच त्याने उत्तर प्रदेशातील एका मंदिरात तब्बल 101 किलो वजनाजी घंटा देवाला अर्पण केली. तरुण पिढीला गुन्हेगारीपासून दूर राहण्याचे अवाहन करण्यासाठी त्याने चक्क अशा प्रकारचे दान दिले आहे. शहाजहानपूर आणि त्या लगतच्या परिसरात नज्जू उर्फ रज्जू नामक डाकूची प्रचंड दहशत होती. 12 वर्षे त्याने त्या भागात राज केले. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला शिक्षा झाली. 58 वर्षांचा नज्जू आता तुरुंगाबाहेर आला आहे. कटरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार वीर विक्रम सिंह 'प्रिन्स' सोबत तरुंगातून बाहेर आलेल्या नज्जू याेन स्टेजही शेअर केले.

नज्जू उर्फ रज्जू याने सोमवारी जिल्ह्यातील परौरा भागात घंटानाद केला. स्थानिक आमदार वीर विक्रम सिंह 'प्रिन्स' यांनी एकेकाळी डाकू असलेल्या नज्जू याला आमचे आदरनीय काका असे संबोधले. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा भोगली आहे. 23 वर्षांनी तो बाहेर आला आहे. गावच्या मातीत मी त्यांचे स्वागत करतो, असे या आमदाराने म्हटले. घंटानाद केल्यानंतर नज्जू यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पश्चाताप झाला आणि तरुण पिढीला गुन्हेगारीपासून दूर राहून आपल्या भविष्याकडे व कुटुंबाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कटराचे आमदार म्हणाले, कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचे असेल, तर मी त्याला मदत करेन. तो माझ्यासोबत मंदिरात गेला आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांबद्दल माफी मागितली. शिवाय त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफीही मागितली. सामान्य माणसाचे जीवन जगण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पोलिस अधीक्षक अशोक कुमार मीना यांनी सांगितले की, नज्जूवर जिल्ह्यात 15 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 1999 च्या खून खटल्याचा समावेश आहे ज्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि बरेली मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले होते. 1999 मध्ये नज्जूने तीन उपनिरीक्षक आणि एका पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर दबाव आणल्याने त्याने 1999 मध्ये आत्मसमर्पण केले आणि तेव्हापासून तो बरेली मध्यवर्ती कारागृहात होता. नज्जूच्या टोळीचा वावर शाहजहानपूर, बरेली, फारुखाबाद, बुदौन, एटा आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये होता.