Food Poisoning in Bihar: पाटणात आसरा होममध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने दोन मुलींचा मृत्यू; खिचडी खाल्ल्यानंतर बिघडली तब्येत

पाटणामध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.आसरा गृह केंद्रात खिचडी खाल्ल्याने मुलींचा मृत्यू झाला आहे.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Food Poisoning in Bihar: पाटणामध्ये अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. शास्त्रीनगर भागात असलेल्या आसरा गृह केंद्रमध्ये ही घटना घडली. आसरा गृह केंद्रात खिचडी खाल्ल्याने मुलींचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय गंभीर परिस्थित असलेल्या अन्य नऊ मुलींवर पीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पटनाचे डीएम चंद्रशेखर सिंह यांनी एडीएमच्या नेतृत्वाखाली चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. (Nagpur Food Poisoning : अंडा बिर्याणी खाल्ल्याने यशवंतपूर एक्स्प्रेसमधील 40 प्रवाशांना विषबाधा; पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास)

मिळालेल्या माहितीनुसार 7 नोव्हेंबरला एका मुलीचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या मुलीचा मृत्यू 10 नोव्हेंबर रोजी झाला. इतर मुलींवर पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलींना पोटाचे आजार झाले होते. पोटाचे दुखणे आणि उलट्या होणे सुरू होते.

मंत्र्यांनी दिले तपासाचे आदेश

दोन मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच समाजकल्याण मंत्रि मदन साहनी यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. छठपूजेच्या दिवशी संध्याकाळी मुलींनी खिचडी खाल्ल्याचे समोर आले आहे.

तपास पथक तैनैत

पाटणा डीएम चंद्रशेखर यांनीही तपासासाठी एक टीम तयार केली आहे. खिचडी खाल्ल्याने 30 हून अधिक मुली आजारी पडल्या होत्या, त्यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. आसरा होम येथील प्रतिनियुक्ती एएनएम रेखा सिंह यांनी सांगितले की, सध्या येथे 44 मुली उपस्थित आहेत.