Fishing Vessel Collides With Submarine: गोव्याच्या किनारपट्टीवर मासेमारी जहाजाची भारतीय नौदलाच्या पाणबुडीला धडक; 11 जणांना वाचवण्यात यश, 2 बेपत्ता

उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Submarine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Fishing Vessel Collides With Submarine: गुरुवारी झालेल्या एका सागरी घटनेत, 13 क्रू सदस्यांसह एक मासेमारी जहाज (Fishing Vessel) गोव्याच्या किनारपट्टीपासून (Goa Coast) सुमारे 70 सागरी मैल अंतरावर भारतीय नौदलाच्या पाणबुडीला (Indian Navy Submarin) धडकले. या घटनेनंतर भारतीय नौदलाने तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि क्रू सदस्यांपैकी 11 जणांना यशस्वीरित्या वाचवले. उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मासेमारी जहाजातील दोन जण बेपत्ता -

नौदलाने मासेमारी जहाजातील दोन बेपत्ता क्रू सदस्यांना शोधण्यासाठी व्यापक संसाधने तैनात केली आहेत. सागरी बचाव समन्वय केंद्र (MRCC), मुंबई यांच्याशीही समन्वय सुरू आहे. तथापी, शोध मोहीम सुरू असतानाच, या घटनेमागील कारणे शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. (हेही वाचा -MiG 29K Fighter Aircraft गोवा जवळ कोसळलं; पायलट सुरक्षित)

संरक्षण मंत्रालयाने जारी केले निवेदन -

दरम्यान, यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 21 नोव्हेंबर 2024 रोजी गोवा किनाऱ्याच्या वायव्येला सुमारे 70 नॉटिकल मैल अंतरावर भारतीय नौदलाच्या पाणबुडी पीएम 21 शी टक्कर झालेल्या मार्थोमा या भारतीय जहाजाच्या दोन क्रू सदस्यांसाठी बचावकार्य सुरू आहे. प्रयत्नांना चालना देण्यासाठी तटरक्षक दलासह अतिरिक्त संसाधने या भागात पाठवण्यात आले असल्याचेही संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.