First Session Of 18th Lok Sabha: लोकसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस; NEET परीक्षा, लोकसभा अध्यक्ष मुद्दे गाजण्याची शक्यता

हंगामी सभापती म्हणून भाजप नेते भर्तृहरी महताब यांच्या नियुक्तीवरील वादामुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Session 2024 प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - X/@DDNewslive)

भारतामध्ये 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन (First Session Of 18th Lok Sabha) आज 24 जून पासून सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये खासदारांचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्यासह सारे खासदार आपली खासदारकीची आज शपथ घेणार आहेत. आजपासून सुरू होणारे अधिवेशन हे वादळी असणार आहे. भाजपा प्रणित एनडीए सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज असणार आहेत. या अधिवेशनात सध्या देशभर NEET-UG आणि UGC-NET या परीक्षांवरून सुरू असलेल्या गदारोळावर प्रश्न विचारले जाणार आहेत. NEET Paper Leak Case: NTA महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची पदावरुन हकालपट्टी. 

दरम्यान आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Bhartruhari Mahtab यांना हंगामी सभापती पदाची शपथ देतील. Mahtab त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे नेते यांना सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावतील.  राष्ट्रपातींनी सुरेश कोडीकुन्नील, थालिकोट्टाई राजुतेवार बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांना अध्यक्ष निवडीपर्यंत  हंगामी अध्यक्षांना  मदत करण्यासाठी नियुक्त केले आहे. नक्की वाचा: Pro-tem Speaker of Lok Sabha: लोकसभेचे सदस्य Bhartruhari Mahtab यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती. 

18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन लाईव्ह स्ट्रिमिंग

26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकांनंतर 18 व्या लोकसभेचे हे पहिले अधिवेशन आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) 293 जागा मिळवल्या आहेत आणि INDIA ब्लॉकने 234 जागा जिंकल्या आहेत आणि त्यातील 99 काँग्रेसकडे आहेत.

हंगामी सभापती म्हणून भाजप नेते भर्तृहरी महताब यांच्या नियुक्तीवरील वादामुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सदस्य के सुरेश, हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत, पण त्यांना हंगामी सभापतीचं पद न देता सरकारकडून त्यांची अवहेलना करण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.