Death | (Photo credit: archived, edited, representative image)

Firozabad Crime News: दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तन्नू कुमार नावाच्या महिलेचा मृतदेह हरियाणाच्या फरिदाबाद येथील तिच्या सासरच्या घराबाहेरील खड्ड्यात (Woman Murdered for Dowry) आढळला. दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या तन्नूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप सासरच्या मंडळींवर होता. ज्यामुळे तिच्या शारिरीक आणि मनसीक छळ झाले होते. उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथील रहिवासी तन्नू कुमारचे दोन वर्षांपूर्वी अरुण सिंगसोबत लग्न झाले होते. कुटुंबाला आता खड्ड्यातून तिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तिच्या सासरच्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

तिचे वडील हकीम यांनी आरोप केला आहे की, तन्नूच्या सासू-सासरच्यांपैकी चार जण, भूप सिंग, मूळचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी, त्यांची पत्नी, मुलगा अरुण सिंग आणि मुलगी काजल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, २३ एप्रिल रोजी अरुण सिंग आणि त्याच्या वडिलांनी मातीकामासाठी एक मशीन मागवली आणि त्याच्या मदतीने त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर १० फूट खोल खड्डा खोदला. दुसऱ्या दिवशी त्यांनी एका गवंडीला तो खड्डा भरण्यास सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनीच त्यांनी तन्नू बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांनी तिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचेही सांगितले होते.

तन्नूच्या वडिलांचा आरोप आहे की त्यांच्या मुलीला तिच्या सासू-सासऱ्यांकडून हुंड्यासाठी सतत त्रास दिला जात होता. लग्नानंतर एक वर्ष तिला तिच्या वडिलांच्या घरी राहण्यास भाग पाडले जात होते. ती पंचायतीमार्फत सासरी परतली. परंतु प्रकरण सुटत नव्हते. शुक्रवारी सकाळी नायब तहसीलदार जसवंत सिंग यांच्यासमोर खड्डा खोदण्यात आला आणि तन्नूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वृत्तानुसार, फरिदाबाद पोलिस प्रवक्त्याने सांगितले की कुटुंबातील इतर सदस्यांना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. दरम्यान, बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी तन्नूचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना सोपवला आहे.