दिल्ली: द्वारका मध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यात व्यावसायिकावर अज्ञात इसमांनी केला बेछूट गोळीबार, पाहा अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ
ANI च्या वृत्तानुसार, द्वारकेमध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यात एका व्यावसायिकावर अज्ञात इसमांनी बेछूट गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रॉपर्टी डिलर नरेंद्र गहलौत (Narendra Gehlot) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहे.
दिल्ली (Delhi) मध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. ANI च्या वृत्तानुसार, द्वारकेमध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यात एका व्यावसायिकावर अज्ञात इसमांनी बेछूट गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रॉपर्टी डिलर नरेंद्र गहलौत (Narendra Gehlot) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी साडे चार च्या सुमारास झाली. द्वारकेतील ओल्ड पालम विहार रोड परिसरात ही घटना घडली.
ही घटना जेव्हा घडली तेव्हा नरेंद्र गहलौत आपल्या कारमध्ये बसले होते. त्यावेळी त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमे-यात हा थरारक व्हिडिओ कैद झाला.
पाहा व्हिडिओ:
हेही वाचा- धक्कादायक! अमेरिका येथील टेक्सास येथे अंदाधुंद गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 21 जखमी
हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. द्वारका पोलीस उपायुक्त एंटो अल्फांसो यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सीसीटीव्ही च्या फुटेजनुसार या हत्येत 2 आरोपी दिसत आहे. ते मोटार सायकलवरुन नरेंद्र गहलौतांची गाडी जिथे होती तेथे आले होते. त्या दोघांपैकी एकाने नरेंद्र वर गोळीबार केला.'
IANS इनपुट