JNU मधील हल्ल्याच्या निषेधार्थ चित्रपट सेलिब्रिटींंनी नोंदवला निषेध; रिचा चड्ढा, विशाल भारद्वाज, तापसी पन्नू, दिया मिर्झा, अनुराग कश्यप आदींचा सहभाग (Video)
या दरम्यान, अनुभव सिन्हा हातात तिरंगा घेताना दिसले, तर अनुराग कश्यप हातात ENOUGH चे प्लेकार्ड घेऊन हल्ल्याला विरोध दर्शवित होते. व्यतिरिक्त चित्रपट अभिनेत्री रिचा चड्ढा, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, सावधन इंडियाचे माजी होस्ट सुशांत सिंग, कुणाल कामरा, तापसी पन्नू, स्वरा भास्काराही या प्रोटेस्टमध्ये सामील होते.
जेएनयू (JNU) हल्ल्याबाबत सर्वत्र विरोध होत आहे. या हल्ल्यानंतर लगेचच सोशल मीडियावरही लोकांनी तीव्र विरोध दर्शविला. देशभरातील अनेक लोक रस्त्यावर निषेध करताना दिसले. याचबाबत आपलाही निषेध नोंदवण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap)आणि अनुभव सिन्हा यांच्यासह अनेक चित्रपट सेलेब्ज, मुंबईतील (Mumbai) कार्टर रोड येथे जमले होते. या दरम्यान, अनुभव सिन्हा हातात तिरंगा घेताना दिसले, तर अनुराग कश्यप हातात ENOUGH चे प्लेकार्ड घेऊन हल्ल्याला विरोध दर्शवित होते. व्यतिरिक्त चित्रपट अभिनेत्री रिचा चड्ढा, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, सावधन इंडियाचे माजी होस्ट सुशांत सिंग, कुणाल कामरा, तापसी पन्नू, स्वरा भास्काराही या प्रोटेस्टमध्ये सामील होते.
जमलेल्या सर्व मंडळींनी शांततेत राष्ट्रगान गायले. जेएनयू कॅम्पसमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा जमलेल्या सर्व सेलेब्जनी शांततेत निषेध नोंदवला. या निदर्शनात इतर शेकडो नागरिकांनीही या सेलेब्जना पाठींबा दिला. आयआयटी कानपूरमध्ये सीएएविरोधात प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्या 'हम देखेंगे' या गाण्यावरुन वाद झाला होता, पण हेच गाणे आज बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एका व्यक्तीने कार्टर रोडमध्ये सुरू असलेल्या निषेधाच्या वेळी गायले. (हेही वाचा: Delhi Police on JNU Violence: गुन्हे शाखेला 'महत्त्वाचा पुरावा' सापडला आहे, आम्ही त्यावर कार्यरत आहोत)
जेएनयू येथे घडलेल्या गोष्टीच्या निषेधार्थ जे बॉलिवूड सेलिब्रिटी सामील झाले होते, त्यांमध्ये तापसी पन्नू, दिया मिर्झा, अनुराग कश्यप, दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेता राहुल बोस, अभिनेत्री गौहर खान, सुप्रसिद्ध स्टॅंड-अप कॉमेडियन कुणाल कामरा, दिग्दर्शक वासन बाला, हंसल मेहता, चित्रपट निर्माते झोया अख्तर आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांची नावे आहेत.
या सेलेब्जव्यतिरिक्त अभिनेत्री रिचा चड्ढा, अली फजल, अभिनेत्री श्वेता त्रिपाठी, दिग्दर्शक नीरज गेहवान, सुधीर मिश्रा, अभिनेते सौरभ शुक्ला, अमैरा दस्तूर, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, विक्रमादित्य मोटवणे, दिग्दर्शक ओनीर, रीमा कागती, किम यांचा समावेश होता.