खुशखबर! Mandwa to Gateway of India दरम्‍यान Ferry Service आज 1 सप्टेंबरपासून सुरू; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा

मांडवा ते मुंबई गेट वे ऑफ इंडिया दरम्‍यान फेरी बोटीतून प्रवासी जलवाहतूक आज 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Photo Credit- X

Mandwa to Gateway of India Ferry Service Start Today : मांडवा ते मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) दरम्‍यान प्रवासी जलवाहतूक फेरी बोट(Ferry service Start Today) आज 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वात जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असल्याने अनेकांना हा उत्तम मार्ग ठरतो. समुद्री मार्ग असल्याने पावसामुळे वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते. मान्सूनमध्ये अनेकवेळा समुद्राला उधाण येते. मोठमोठ्या लाटा उसळतात. त्यामुळे 26 मे पासून सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता मान्सूनचा धोकादायक काळ गेल्याने ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. (हेही वाचा:मांडवा – गेटवे फेरी बोट 1 सप्टेंबरपासून सुरू होणार; गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा)

त्याशिवाय, गौरी-गणपती निमित्ताने अलिबाग, मुरुड येथे येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. पावसाळा संपत आल्‍यानंतर हवामान आणि समुद्राच्‍या लाटांचा अंदाज घेवून पुन्हा फेरी बोटींची सेवा सुरू करण्यात येते. मेरीटाइम बोर्डाकडून ही सेवा सुरू करण्‍याबाबत निर्णय घेतला जातो. आता फेरी बोटींची सेवा सुरू होत असल्याने मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणार आहे.

आठ महिने मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या पंधरा लाखांच्या आसपास आहे. मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार हा आकडा समोर आला आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्‍सव सुरू होत आहे. हा जलमार्ग खुला होत असल्याने गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर

मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढला आहे. खराब हवामानाचा अडथळा दूर होईल तेव्हाच या मार्गावर दिवसा जलवाहतूक सुरु राहिल. तशा सुचना सबंधीत वाहतूक करणाऱ्या कंपन्‍यांना देण्यात आल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फेरीबोट सुरु करण्यापूर्वी त्यांची डागडुजी, सुरक्षा साधनांची तपासणी करण्यात येतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif