Farmer Protest: लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत, दिल्ली पोलिसांनी सिंघु बॉर्डरवर उभारली संरक्षक भिंत

ज्यामध्ये दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे 2500 ते 3000 जवान तैनात करण्यात येणार आहेत. रविवारपर्यंत सुमारे शंभर पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान येथे सिंघु बॉर्डरवर दाखल झाले आहेत.

दिल्लीत पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कूच केली आहे. 13 फेब्रुवारी रोजी 'दिल्ली चलो'ची हाक शेतकरी संघटनांनी (Delhi Farmers Protest) दिली आहे. यामध्ये सुमारे 200 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सिंघू बॉर्डरवर बंदोबस्त वाढवलाय. रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात काटेरी तार, मातीने भरलेली पोती, सिमेंट, लोखंडी बॅरिकेड्स आदी वस्तू सिंघू बॉर्डरवर आणले जात आहेत. (हेही वाचा - Farmers Protest: शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो मार्च' पूर्वी पंजाब-हरियाणा सीमा बंद, कलम 144 लागू)

पाहा व्हिडिओ -

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात तयारी जवळपास पूर्ण केलीय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे. इतकेच नाही तर बॉर्डरजवळील दिल्लीच्या सीमेवर बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे नीट केले जात आहेत.

पाहा व्हिडिओ -

सिंघू सीमेवर 16 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे 2500 ते 3000 जवान तैनात करण्यात येणार आहेत. रविवारपर्यंत सुमारे शंभर पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान येथे सिंघु बॉर्डरवर दाखल झाले आहेत.