Dalipora Encounter: पुलवामा मध्ये भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक, तीन दहशतवादी ठार

तर या चकमकीमध्ये एक भारतीय सुरक्षा व्यवस्थेतील जवानदेखील शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत.

Dalipora Encounter (Photo Credits: Twitter)

जम्मू काश्मिर मधील पुलवामा भागामध्ये दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यामध्ये आज (16 मे) पुन्हा चकमक झाली आहे. दलीपोरा परिसरात झालेल्या या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलं आहे. तर या चकमकीमध्ये एक भारतीय सुरक्षा व्यवस्थेतील जवानदेखील शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. या भागात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे.

ANI Tweet

सुत्रांच्या माहितीनुसार, दलीपोरा भागामध्ये दहशतवादी एका घरामध्ये लपून बसले होते. सुरक्षा जवानांनी त्या भागाला घेरल्याचं पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर फायरिंग करण्यास सुरूवात केली आहे. पुलवामा भागामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif