IPL Auction 2025 Live

Surgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती?

या निमित्ताने जाणून घेऊ नेमकं सर्जिकल स्ट्राईक काय असतं? जगभरात झालेली आतापर्यंतची 6 महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती आहेत?

सेना (Phtoto Credits: Twitter)

सर्जिकल स्ट्राइक (Surgical strike)ही लष्करी रणनीतींमधील एक महत्त्वाची मोहिम असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्जिकल स्ट्राईक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांमध्ये देखील पहायला मिळाला होता. 'गनिमी कावा' म्हणून त्याची दहशत महाराजांच्या दुश्मनांच्या मनात होती. सर्वसामान्यपणे रात्रीच्या प्रहरात आखलेलं हे गुप्त मिशन असते. विशिष्ट लक्ष्य साधून ते संपूर्ण नष्ट करण्याचा मानस असतो. त्यासाठी लष्करी फौजा विशेष प्रकारे सज्ज केल्या जातात. दरम्यान आज (29 सप्टेंबर) भारताचा उरी मधील सर्जिकल स्टाईकची चौथी वर्षपूर्ती आहे. या निमित्ताने जाणून घेऊ नेमकं सर्जिकल स्ट्राईक काय असतं? जगभरात झालेली आतापर्यंतची  महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती आहेत?

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

सर्जिकल स्ट्राईक ही प्रामुख्याने दुश्मनाच्या रडार वर जाऊन केली जाणारी एक सुनियोजित सैन्य कारवाई असते. याचं प्रमुख उद्दिष्ट निश्चित लक्ष्यावर टार्गेट करून त्याला पूर्णपणे नेस्तानाबूत करणं हे आहे. मात्र या कारवाईमध्ये सामान्य, निर्दोष लोकं, साधन संपत्ती यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असते.

सर्जिकल स्ट्राईक कसा केला जातो?

सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी त्या नेमक्या जागेची गुप्तपणे रेकी केली जाते. त्यानंतर योग्य वेळ पाहून हल्ला केला जातो. यामध्ये शत्रूला ना त्याची भणक लागू देत ना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ दिला जातो. यादरम्यान केवळ सरकार, सेना आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय ठेवला जातो.

जगातील महत्त्वाचे सर्जिकल स्ट्राईक्स!

उरी सर्जिकल स्ट्राईक

जम्मू कश्मीर मध्ये उरी प्रांतात 17 भारतीय लष्कराच्या जवानांवर हल्ला झाल्यानंतर 28- 29 सप्टेंबर 2016 ला भारतीय लष्कराने पाकला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 7 ठिकानांवर हल्ला करण्यात आला. Surgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी.

पुलवामा हल्ल्यानंतर स्ट्राईक

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्लाअ करण्यात आला होता. त्यावेळेस 40 जण ठार झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून 12 मिराज विमानांच्या मदतीने हल्ला करण्यात आला होता. दहाशतवाद्यांचे कॅम्प उद्धवस्त करण्यासाठी 1000 किलो बॉम्ब हल्ला झाला होता. Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे

ऑपरेशन हॉट पॅरॅशूट

मणिपूर मध्ये चंदेल भागात भारतीय सेनेवर हल्ला झाला होता त्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी 70 भारतीय कमांडोना म्यानमारच्या जंगलात सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी पाठवण्यात आले होते. याला ऑपरेशन हॉट पॅरॅशूट म्हणतात.

ऑपरेशन नेपच्यून स्पीयर

अमेरिकेत 9/11 हल्ल्यानंतर मास्टर माईंड ओसामा बिन लादेन ला ठार मारण्यासाठी खास सर्जिकल स्ट्राईक आखले होते. यामधेय 23 जण आणि 2 हेलिकॉप्टर होते. यामध्ये पहिला लादेनचा मुलगा ठार मारला गेला होता. तर नंतर लादेनला ठार मारण्यात आले.

युगांडाच्या एन्तेबे विमानतळावरील सर्जिकल स्ट्राईक

1976 साली फिलिस्तानच्या मुक्तीसाठी एका गटाने एअर फ्रांसचे विमान अपहरण केले होते. त्यावेळेस युगांडाच्या एन्तेबे विमानतळावरील सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते.