Gautam Adani यांना मोठा झटका, 43,500 कोटी रुपयांचे शेअर्स गोठवले; Bombay Stock Exchange मध्ये समभाग कोसळले
बाजार मंदपणे सुरु होतानाच अडाणी ग्रुप (Adani Group ) संदर्भात एक चिंता वाढवणारी बातमी आली. त्यानंतर काहीच वेळात बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. अडाणी समूहाचे समभाग आज मोठ्या प्रमाणावर कोसळताना दिले. उद्योगपती गौतम अडाणी (Gautam Adani) यांना हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
शेअर बाजार आज काहीसा निस्तेजपणे सुरु झाला. बाजार मंदपणे सुरु होतानाच अडाणी ग्रुप (Adani Group ) संदर्भात एक चिंता वाढवणारी बातमी आली. त्यानंतर काहीच वेळात बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. अडाणी समूहाचे समभाग आज मोठ्या प्रमाणावर कोसळताना दिले. उद्योगपती गौतम अडाणी (Gautam Adani) यांना हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. मुंबई शेअर मार्केट अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) सोमवारी सकाळी 18 अंकांच्या मुजबुतीसोबत 52,492.34 वर उघडला. परंतू थोड्याच वेळात मार्केटमध्ये (BSE) लाल निशाण दिसू लागले. सकाळी 9.34 च्या दरम्यान सेन्सेक्स 538 अंकांनी घसरुन 51,936.31 वर पोहोचला.
दरम्यान, नेशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 8 अंकांनी घसरुन 15,791.40 वर उघडला. सकाळी 9.35 पर्यंत निफ्टी घसरुन 15,606.50 वर पोहोचला. आयटीशिवाय इतरही काही क्षेत्रांमध्ये निर्देशांक धोकादायक वळणावर पोहोचला. मेटल, पावर, रियल्टी, पीएसयू बँक अशा काही कंपन्यांच्या समभागांमध्ये 2% ते 3% घसरण पाहायला मिळाली.
नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (NSDL) ने तीन विदेशी गुंतवणुकदारांच्या अकाऊंटवर निर्बंध लावले. या गुंतवणुकदारांचा अडानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 43,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. (हेेही वाचा, Gold Silver Price Today: सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दर कसे आहेत? घ्या जाणून)
प्राप्त माहितीनुसार, अडाणी एंटरप्रायजेस शेअर 15% घसरुन 1361.25 रुपयांवर पोहोचला. अदानी पोर्ड्स अँड इकॉनॉमिक जोन शअर 14%, अडाणी पॉवर 5% अडानी ट्रान्समिशन 5%, अडानी ग्रीन एनर्जी%, अडानी टोटल गैस 5% घसरले.
दरम्यान, बंद झाला तेव्हा बाजार शुक्रवारी चांगली स्थिती होती. सेन्सेेक्स आणि निफ्टी आपल्या उच्चांकी स्थानावर होते. सकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स 177 अंकांनी वाढसह उघडला. सकाळी 11.10 वाजणेच्या आसपास सेन्सेक्स 341 अंकांनी उघडला सोबत आतापर्यंतच्या ऐतिहासिक उंचीवर 52,641.53 इतक्या स्थानावर पोहोचला.