Elderly Couple Commits Suicide In Charkhi: 30 कोटींची संपत्ती असलेला मुलगा, नातू  IAS पण वृद्ध आजी-आजोबांना जेवणाची भ्रांत असल्याने आत्महत्या करून संपवलं जीवन

त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं नाही.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडीयात सध्या हरियाणामधील वृद्ध आजी आजोबांच्या आत्महत्येची चर्चा रंगली आहे. वयाची 75 वर्ष पार केलेल्या आजी आजोबांच्या सुसाईड नोट मध्ये मुलगा करोडपती, नातू आयएएस अधिकारी असूनही घरात जेवायला मिळत नाही मुलगा-सुनेकडून त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याचं लिहण्यात आलं आहे. जगदीशचंद्र आर्य आणि भागली देवी अशी आत्महत्या केलेल्या वृद्ध आजी-आजोबांची नावं आहेत. हे दोघेही बाढडा येथे आपल्या मुलासोबत राहत होते. पण त्यांना दोन वेळेस भाकरी देखील मिळत नव्हती असं त्यांनी नोट मध्ये लिहलं आहे.

आजी आजोबांच्या सुसाईड नोट नुसार, पोलिसांनी त्यांच्या मुलगा, 2 जावई, पुतण्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘मी जगदीशचंद्र आर्य तुम्हाला माझे दु:ख सांगतो. माझ्या मुलाची बाढडा मध्ये 30 कोटींची संपत्ती आहे, पण मला देण्यासाठी त्याच्याकडे दोन भाकरी नाहीत. आम्ही धाकट्या मुलासोबत राहत होतो. 6 वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्यांच्या पत्नीने आम्हाला काही दिवस ठेवले पण नंतर तिने मला काही कारणास्तव मारहाण केली. त्यानंतर माझा पुतण्या मला त्याच्यासोबत घेऊन गेला.’कोणीही आपल्या आई-वडिलांवर एवढे अत्याचार करू नयेत. शिवाय मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना सरकार आणि समाजाने शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल असंही त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.

दरम्यान वृद्ध दाम्पत्याचा नातू विवेक आर्य हा 2021 च्या बॅचचा IAS अधिकारी आहे. सध्या चार जणांविरोधात वृद्ध जोडप्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी जबाबदार ठरवण्यात आले आहे.

वृद्ध दांम्प्त्याने बुधवारी रात्री विषप्राशन करून आपलं जीवन संपवलं आहे. त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं नाही. त्यांनी मृत्यू पश्चात आपली संपत्ती समाजकार्यासाठी वापरण्याचे सुसाईड नोट मध्ये नमूद केले आहे. [Poll ID="null" title="undefined"]



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif