Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर होते. भूकंपाची खोली जमिनीपासून 86 किमी खाली होती. भूकंपामुळे झालेल्या जीवित किंवा वित्तहानीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये आज 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंपाचा धक्का जम्मू आणि काश्मीरमध्येही जाणवला. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर होते. भूकंपाची खोली जमिनीपासून 86 किमी खाली होती. भूकंपामुळे झालेल्या जीवित किंवा वित्तहानीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, भूकंप अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेजवळील भागात झाला.

भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले की भूकंप 130 किमी खोलीवर होता. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंतची पृथ्वी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरली आहे. पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याआधीही या भागात मोठे भूकंप झाले आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. (हेही वाचा -Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचा भूकंप; दिल्ली पर्यंत जाणवले धक्के)

अफगाणिस्तानला 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप - 

याआधी शनिवारी देखील जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मध्यम तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू पाकिस्तानमध्ये होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये होते आणि ते जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होते. तथापि, भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement