IPL Auction 2025 Live

गुजरात: मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरांनी केली प्रसुती, आई-बाळाचा मृत्यू

एका डॉक्टरने मद्यधुंद अवस्थेत महिलेची डिलिव्हरी केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit: File Photo)

गुजरातच्या (Gujarat) बोटाद (Botad) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हरगर्जीपणामुळे एका आई आणि बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांनी मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी केल्यामुळे आई आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डॉक्टरांच्या हरगर्जीपणामुळे एका आई आणि बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असून डॉक्टरांची चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर ब्रेथ एनालाईजर (breathalyzer) च्या साहाय्याने डॉक्टरांची तपासणी केली जाईल.

आपल्याकडे डॉक्टरांना देवाचे रुप मानले जाते. कारण कोणत्याही गंभीर आजारातून वाचवण्यासाठी डॉक्टरांचे उपचारच कामी येतात. मात्र डॉक्टरचं रुग्णाच्या जीवावर उठले तर..? हरगर्जीपणाची आणि निष्काळजीपणाची शिक्षा संबंधित डॉक्टरला देण्यात येईल. पण त्यामुळे मृत मातेच्या आणि बाळाच्या कुटुंबियांचे झालेले नुकसान भरुन निघणार नाही. गुजरातमध्ये दारुबंदी असताना अशी घटना घडणे अत्यंत लाजिरवाणे आहे.