COVID 19 Vaccination In India: भारतामध्ये 50% लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण; 'गर्वाचा क्षण' असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री Dr Mansukh Mandaviya यांचं ट्वीट
सध्या भारतामध्ये हिमाचल प्रदेश हे एकमेव असं राज्य आहे ज्यांनी त्यांच्या राज्यातील 100% लाभार्थ्यांना कोरोनाची लस दिलेली आहे.
भारतासह जगभरात सध्या ओमिक्रॉन वायरसचा धोका वाढता आहे. पण अशामध्ये एक दिलासादायक बातमी देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी आज दिली आहे. भारतामध्ये सध्या 50% लाभार्थी नागरिकांचे कोविड19 लसीचे (COVID 19 Vaccine) म्हटलं आहे. भारतामध्ये कोरोना लसीचे डोस दिलेल्यांचा आकडा 127.61 कोटी पेक्षा अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 84.8% भारतीयांना किमान कोविड 19 लसीचा पहिला डोस मिळालेला आहे. भारतामध्ये काल देखील 24 तासांत 1 कोटी पेक्षा अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा विक्रम भारतामध्ये दुसर्यांदा झाला आहे. काल सुमारे 1,04,18,707 जणांना कोविडचे डोस देण्यात आले आहेत. हा विक्रम 1,32,44,514 सेशन मध्ये करण्यात आला आहे.
मनसुख मांडवीय यांचे ट्वीट
भारतामध्ये 16 जानेवारी 2020 दिवशी कोविड 19 लसीचे डोस देण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीला भारतामध्ये कोरोनाचे डोस हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना त्यानंतर वयोवृद्ध आणि हाय रिस्क गटातील नागरिकांना देण्यात आला आहे. नंतर टप्प्याप्याने 60 वर्षांवरील नागरिकांना, को मॉर्बिडीटी असलेल्यांना आणि नंतर 18 वर्षांवरील लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या भारतामध्ये हिमाचल प्रदेश हे एकमेव असं राज्य आहे ज्यांनी त्यांच्या राज्यातील 100% लाभार्थ्यांना कोरोनाची लस दिलेली आहे. त्यांनी 53,86,393 लाभार्थ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. तर आजच पुदुच्चेरी मध्ये कोविड 19 लसीकरण प्रत्येकासाठि बंधनकारक करण्यात आले आहे. 10 लाख लोकसंख्या असलेल्या या केंद्रशासित प्रदेशामध्ये 7 लाख पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे आणि 2 लाख जणांचे लसीकरण बाकी आहे.