Lockdown: देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु, हे असतील महत्त्वाचे नियम
मुंबई रेड झोन मद्ये येत असल्यामुळे येथे विमानसेवा सुरु करण्यात येऊ नये यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरूवातीला विरोध केला होता. मात्र हळूहळू जनजीवन पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने ही परवानगी दिली आहे.
कोरोना संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने लॉकडाऊन (Lockdown) देखील वाढविण्यात आला. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यामुळे लोकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविण्यासाठी तसेच देशाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आजपासून देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. यात मुंबईतील विमानतळावर आज ब-यापैकी वर्दळ दिसली. मुंबईत (Mumbai) सुरुवातील दररोज 25 विमानांचं लँडींग आणि तेवढीच विमानं उड्डाण घेणार आहेत.
मुंबईसह गुजरात, ओडीशा, कर्नाटक विमानतळावर देखील आज प्रवाशांची गर्दी दिसली. मुंबई रेड झोन मद्ये येत असल्यामुळे येथे विमानसेवा सुरु करण्यात येऊ नये यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरूवातीला विरोध केला होता. मात्र हळूहळू जनजीवन पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने ही परवानगी दिली आहे.
मुंबईत विमानसेवा पुन्हा सुरु करण्यासाठी महत्त्वाचे नियम घालण्यात आले आहेत. त्यात 80 वर्षावरील आणि गरोदर महिलांना प्रवास प्रतिबंधीत करण्यात आला आहे. 14 वर्षांवरील सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अँप बंधनकारक असणार आहे. तसेच मुंबईत येणा-या प्रत्येक प्रवाशांना घरी अलगीकरणात राहावं लागणार आहे.
यासंदर्भात विमानतळ संचालकांची आज एक महत्त्वाची बैठकही होणार आहे. विमानतळाची सुरक्षा आणि सगळी काळजी घेऊन ही सेवा सुरू केली जाणार आहे