International Yoga Day 2019: जम्मू मध्ये BSF च्या श्वानपथकातील कुत्र्यांनी चक्क प्रशिक्षकांकडून घेतले योगसाधनेचे धडे; पहा त्यांचा Super Cute Video

जम्मू (Jammu) मध्येचक्क BSF च्या श्वान प्रशिक्षणकांसोबत (Dog Scod Trainer) ) त्यांच्या शिष्यांनी म्हणजेच चक्क श्वानांनी (कुत्रे) योगा केला.

BSF Dog Scod Doing Yoga (Photo Credits: ANI)

International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आज जगभरातील प्रत्येक जण योगा आणि योगसाधनेचे धडे देताना दिसेल. योगा हे एक शास्त्र आहे. योगसाधनेचा उपयोग मनाला एकाग्र आणि बुद्धीला कुशाग्र करण्यासाठी होतो. आजच्या योगा दिनी प्रत्येक नागरिक योगसाधनेचे धडे देत किंवा धडे गिरवत आज आपल्याला दिसेल. मात्र या सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी घडलयं जम्मू (Jammu) मध्ये. येथे चक्क BSF च्या श्वान प्रशिक्षणकांसोबत (Dog Scod Trainer) ) त्यांच्या शिष्यांनी म्हणजेच चक्क श्वानांनी (कुत्रे) योगा केला.

या व्हिडिओ इतका क्यूट आहे की , तो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, प्राणीही इतका चांगला योगा करु शकतात. पाहा व्हिडिओ

या व्हिडिओत आपले प्रशिक्षक जसे योगा (Yoga) करत आहेत तसाच्या तसा योगा हे श्वान करताना दिसत आहे. त्याच्या एकून शरीराच्या हालचालीवरुन आणि त्यांचा उत्साह पाहून तो हा योगा किती एन्जॉय करतायत हे व्हिडिओत स्पष्ट दिसतय. तसेच जेव्हा त्यांचे प्रशिक्षक आपला एक पाय वर करुन उभे राहिले तेव्हा चक्क कुत्र्यांनीही आपले दोन पाय वर करुन हा योग प्रकार केला.

हेही वाचा- International Yoga Day: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपति भवनात तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजपथावर साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिवस

प्राण्यांमुळे का होईना पण ह्या व्हिडिओमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळेल. आणि ते योगसाधनेस प्रामाणिकपणे सुरुवात करतील असे म्हणायला काही हरकत नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif