American Bully Dog Attack On Minor: अमेरिकन बुली कुत्र्याचा हल्ला, 7 वर्षांच्या मुलीसह 15 जण जखमी
नवी दिल्ली येथील रोहिणी सेक्टर-25 परिसरात (Rohini, Rohini Sector-25) एका सात वर्षांच्या मुलीवर शेजारच्या अमेरिकन बुली कुत्र्याने (American Bully Dog) केलेल्या हल्ल्याचा सामना करावा लागल्याने मोठा हल्ला केला आहे.
Dog Attack in Delhi: नवी दिल्ली येथील रोहिणी सेक्टर-25 परिसरात (Rohini, Rohini Sector-25) एका सात वर्षांच्या मुलीवर शेजारच्या अमेरिकन बुली कुत्र्याने (American Bully Dog) केलेल्या हल्ल्याचा सामना करावा लागल्याने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याशिवाय या कुत्र्याच्या हल्लात 15 हून अधिक जण जखमी झाल्याची भयावह घटना घडली आहे. रोहिणी परिसरात 9 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, परिसरातील बेकायदा कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाविरोधातही निदर्शने करण्यात आली आहेत. सदर घटनेबाबत पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
अमेरिकन बुली प्रजातिच्या कुत्र्याकडून हल्ला
घटनेबाबत माहिती अशी की, पीडिता तिच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये मित्रांसोबत खेळत होती. दरम्यान, तिच्यावर अमेरिकन बुली प्रजातिच्या पाळीव कुत्र्याचा हल्ला झाला. हा कुत्रा तिच्या शेजाऱ्यांचा आहे. या हल्ल्यात पीडिता गंभीर जखमी झाली. तिचे वडील श्रीकांत भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या हाताला, पाठीला, कानाच्या मागे, पायाला आणि डोळ्याखाली मोठ्या जखमा झाल्या आहेत. कुत्र्याने हल्ला केल्यानंतर तिने केलेला आरडाओरडा ऐकून सोसायटीतील नागरिक धावत आले. त्यांनी प्रतिकार केल्याने कुत्रा दूर पळाला आणि तिचे प्राण वाचले. (हेही वाचा, Pune Dog Attack Video: पुण्याच्या हांडेवाडीत भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्या वर हल्ला, व्हिडिओ व्हायरल)
कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रार
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना भगत यांनी सांगितले की, आमच्यासाठी हा अत्यंत क्लेशकारक अनुभव आहे. ज्यामध्ये आमची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. धक्कादायक म्हणजे इतके सगळे घडूनही ज्यांच्या कुत्र्याने हा हल्ला केला ते आम्हाला कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नाहीत. त्यामुळे आम्ही कुत्र्याच्या मालकाविरोधात पर्यायाने शेजाऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाढत्या कुत्र्यांच्या उपद्रवावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोसायटीतील रहिवाशांनी निषेधार्थ मशाल मोर्चा काढला. भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्या नागरिकांबाबत स्थानिक रहिवाशांनी जोरदार निदर्शने केली. श्वानप्रेमींचे प्रेम लहान मुलांच्या जीवावर बेतत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Punjab Dog Attack: मोहालीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, चार वर्षाच्या मुलावर हल्ला)
पोलीस कारवाई :
पोलिसांकडून या प्रकरणात आयपीसीच्या कलम 289 (प्राण्यांबाबत निष्काळजी वर्तन) आणि 337 (अविचारीपणे किंवा निष्काळजीपणे मानवी जीवन धोक्यात आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुत्र्याच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले जाईल. तपासामध्ये आणकी काही आढळले तर त्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा भटके आणि पाळीव कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या नारिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.