Delhi Shocker: दिल्लीत दोन दिवसात दोन बालकांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्यात मृत्यू
कुटुंब राहत असलेल्या झोपडीच्या शेजारील जंगलात मुलाच्या आईला त्याचा शोध घेण्यासाठी मदत करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली होती. दोन तास शोध घेतल्यानंतर, मुलाचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी सापडला
दिल्ली आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. आनंद (7) आणि आदित्य (5) या दोन भावांना दिल्लीत भटक्या कुत्र्यांनी दोन दिवसांत हल्ला करून ठार केले. शुक्रवारी शहरातील वसंत कुंज परिसरातून एक मुल हरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कुटुंब राहत असलेल्या झोपडीच्या शेजारील जंगलात मुलाच्या आईला त्याचा शोध घेण्यासाठी मदत करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली होती. दोन तास शोध घेतल्यानंतर, मुलाचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी सापडला, त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या ज्या एखाद्या प्राण्याने केल्यासारखे वाटत होते. स्थानिकांनी पोलिसांना सांगितले की, आनंदवर जंगलातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून शेळ्या आणि डुकरांवरही हल्ला केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आला. (Assam Murder Case: कौटुंबिक वादातून 7 वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या)
या घटनेनंतर दोन दिवसांनी आनंदचा लहान भाऊ आदित्य आणि त्याचे चुलत भाऊ आज झोपडीजवळ खेळत होते. आदित्यपासून थोडा दूर गेलेला चुलत भाऊ चंदन थोड्या वेळाने परतला तर त्याचा भाऊ जखमी अवस्थेत आणि भटक्या कुत्र्यांनी वेढलेला दिसला. परिसरात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने हा गोंधळ ऐकला आणि आदित्यला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.