Delhi Red Alert: चार दहशतवादी घुसल्याची माहिती; दिल्ली पोलिसांनी 9 ठिकाणांवर मारले छापे

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार 3 ते 4 दहशतवादी दिल्लीत शिरले असल्याने देशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट वर आहेत. तसेच दिल्ली शहरातील अनेक भागांत  रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून एअरपोर्ट, सरकारी संस्था तसेच मॉल्स मधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असून ते अफगाणिस्तान पासपोर्टच्या मदतीने देशात घुसले आहेत. काल (बुधवार) रात्री दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीने शहरातील 9 ठिकाणी छापे मारले. त्याचसोबत दिल्लीतील विविध भागांत वाहनांचीदेखील कसून चौकशी करण्यात येत आहे.

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यामुळे या दहशतवाद्यांनी भारतात मोठा आत्मघाती  हल्ला दसरा किंवा दिवाळी सणांच्या मुहूर्तांवर करण्याची योजना केली असल्याचे समजते.