दिल्ली: हुंड्याच्या मागणीतून गर्भवती विवाहितेची हत्या; नवऱ्यानेच डोक्यात गोळी घालून बिल्डींगच्या गच्चीतून फेकले खाली

दिल्लीच्या (Delhi) कापाशेरा (Kapshera) भागात हुंडयासाठी गर्भवती विवाहितेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

दिल्लीच्या  (Delhi) कापाशेरा (Kapshera) भागात हुंडयासाठी गर्भवती विवाहितेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला महिलेच्या पतिसहित सासरच्या कुटुंबाने हा एकूणच प्रकार हत्या नसून आत्महत्या असल्याचा दावा केला होता मात्र शवविच्छेदन अहवालाच्या माहितीनुसार, महिलेच्या डोक्यात  गोळी मारून मग तिला राहत्या इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी महिलेचा पती रोहित याला हरियाणा (Hariyana) सोनिपत (Sonipat Police) येथून पोलिसांनी अटक केली आहे. इतका मोठा गुन्हा केल्यावरही रोहित अथवा कुटुंबाला या कृत्याचा पश्चाताप नसून उलट महिलेने हुंडा न दिल्याने अशी वागणूक दिली गेली असे त्यांनी  छातीठोक पणे सांगितले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रोहित याचा 9  मार्च 2015 रोजी विवाह झाला होता. याआधी रोहितच्या कुटुंबाने पैसा आणि एसयूव्ही कार मागितल्यामुळे साखरपुडयाच्या वेळीच दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. समजुतीने दोघांनी लग्न मात्र लावून दिले मात्र तरीही घरी सतत भांडणे सुरु होती. हत्येच्यावेळी रोहितची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती होती.तर, या जोडप्याला पहिला दीड वर्षांचा मुलगा आहे. या बाळा नंतर रोहितच्या कुटुंबाने हुंडयासाठी तगादा लावला होता. Video: बायकोला माराहण कशी करावी? कतार येथील व्यक्तिकडून YouTube वर प्रशिक्षणाचा व्हिडिओ पोस्ट

दरम्यान, रोहितकडे बंदूक कशी आली याचा अभ्यास करताना ही बंदूक परवानाधारक असून त्याच्या वडिलांकडे त्याचे लायसन असल्याचे उघड झाले आहे. गोळी घातल्यावर  गच्चीवरुन खाली फेकल्यामुळे महिलेच्या कवटीमध्ये अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते आणि त्याच क्षणी तिचा मृत्यू झाला.