दिल्ली: अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सुरेश या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Delhi Police registers FIR against Suresh, who had slapped Delhi CM Arvind Kejriwal (Photo Credits: ANI)

काल (4 मे) दिल्लीतील (Delhi) मोती नगर (Moti Nagar) भागातील रोड शो (Roadshow) दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सुरेश नावाच्या व्यक्तीने कानशिलात लगावली. या प्रकरणी सुरेश याला कलम 107/51 अंतर्गत दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली: मोतीनगर येथील रोड शो दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकवली (Video)

ANI ट्विट:

यापूर्वी पोलिसांनी सुरेश याला अटक करुन भारतीय दंड विधान कलम 323 (मारहाण करणे) या अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

ANI ट्विट:

लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारासाठी दिल्लीतील मोतीनगर भागात रोड शो दरम्यान जमाव केजरीवाल यांच्या नावाचा जयघोष करत असताना दिल्लीच्या कैलाश पार्क स्थित सुरेश नावाच्या व्यक्तीने थेट जीपवर चढत केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. यापूर्वी देखील 2014 मध्ये केजरीवाल यांना एका ऑटो ड्रायव्हरने कानशिलात लगावली होती.