बिहार मध्ये छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच पोलिसांकडून अटक

त्यावेळी मात्र अशी घटना घडली की, चक्क पोलिसांनाच पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

बिहार (Bihar) येथे सुपौलमध्ये एक गमतीशीर घटना घडली आहे. दिल्ली येथील पोलिस बिहारमध्ये लग्नासाठी प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी मात्र अशी घटना घडली की, चक्क पोलिसांनाच पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दिल्लीतील रोहिणी येथील लग्नासाठी घरातून पळालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी दिल्लीहून बिहार येथे आले होते. तर फरार झालेल्या मुलीच्या घरातील मंडळींनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली होती. त्यानुसार पोलिसांनी मार्ग काढत या दोघांना चकला येथील निर्मली मधील एका घरातून ताब्यात घेतले. या घटनेने परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या दोघांवर कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना एक पोलिस कर्मचारी दारुच्या नशेत आढळून आला.

त्यावेळी नागरिकांनी एक्साईज विभागाला पोलिसांच्या स्थिती बद्दल सांगत तक्रार केली. त्यावेळी एक्ससाईज विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहचून एका दिल्ली पोलिसाला अटक केली आहे. तसेच तपास केल्यानंतर दिल्ली पोलिस मुख्य अधिकारी मुकेश कुमार असे त्याचे नाव असल्याचे उघडकीस आले आहे.

तर पोलिसांनी मुलीला अपहरणाबद्दल विचारले, त्यावेळी तिने माझे अपहरण झाले नसून प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले असल्याचे सांगितले. तसेच निर्मली येथे आम्ही दोघांनी भाड्याच्या घरात राहत असल्याचे पोलिसांना सांगितले.