Boy Dies Beaten Up By Senior Students: वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीत 11 वर्षीय मुलाचा मृत्यू, वडिलांकडून डॉक्टरांवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप
त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर वडिलांनी डॉक्टरांवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा (Medical Negligence) आरोप केला आहे.
Delhi Boy Dies During Treatment: एकाच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये झाललेल्या भांडणाचे पर्यावसन 11 वर्षीय मुलाच्या मृत्यूमध्ये झाले आहे. घटना नवी दिल्ली येथील आहे. प्राप्त माहितीनुसार, वरच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींनी केलेल्या बेदम मारहाणीत (Delhi Boy Beaten Up By Senior Students) 11 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर वडिलांनी डॉक्टरांवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा (Medical Negligence) आरोप केला आहे. सदर घटना 20 जानेवारी रोजी घडल्याचे समजते. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 304 नुसार दोषी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. जबाबदारी निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी या दुःखद घटनेच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा सखोल तपास सुरू केला आहे. (हेही वाचा, Mumbai News: इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, घाटकोपर येथे खळबळ)
पीडित मुलावर खासगी रुग्णालयात उपचार
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की 11 जानेवारी रोजी, त्यांच्या मुलाने शाळेतून घरी परतल्यावर वरिष्ठ विद्यार्थ्यांनी शारीरिक हल्ला केल्याची माहितीदिली. आम्ही त्याच्या शरीराची पाहणी केली असता त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे पाहायला मिळत होते. आम्ही मुलाला तातडीने दीपचंद बंडू हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय मदत शोधत असूनही, आम्हाला रुग्णालयात वेळेवर ऑर्थोपेडिक सेवा मिळण्यात अडचणी आल्या. कारण आम्ही प्रवेश करताच सदर विभाग बंद झाला. परिणामी, त्यांनी रोहिणीतील एका खाजगी दवाखान्यातून उपचार घेण्याचा प्रयत्न केला, जिथे मुलाच्या प्रकृतीसाठी अतिरिक्त औषधे लिहून दिली होती. (हेही वाचा, Rape And Murder On Minor Girl: सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, 17 वर्षीय मुलास अटक)
डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आम्ही घेऊन आलो. मात्र दुर्दैवाने, मुलाची प्रकृती झपाट्याने खालावली. 20 जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दीप चंद बंधू रुग्णालयातच ठेवण्यात आला. जेथे उपचारादरम्यान त्याचा दुःखद मृत्यू झाला. रुग्णालयाने शवविच्छेदन तपासणी केली, ज्यामध्ये असे दिसून आले की मुलाच्या डाव्या गुडघ्याला आघात झाला होता. ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता. शवविच्छेदन प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण पोलिासांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, ज्या ठिकाणी पीडिताला बेदम मारहाण झाली. ते ठिकाण आणि परिसर पोलीस नजरेखाली घालत आहेत. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, घटनेची दखल घेतली असून तपास सुरु आहे.