Delhi CM Arvind Kejriwal 8 समन्सनंतर पहिल्यांदाच ED ला उत्तर देण्यास तयार; समोर ठेवली 'ही' अट

या प्रकरणामध्ये त्यांना यापूर्वी 8 वेळा समन्स बजावण्यात आला होता.

Arvind Kejriwal (File Image)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना ईडी (ED) ने 8 वेळा चौकशीसाठी समन्स बजावला होता. मात्र सारे समन्स त्यांनी फेटाळला. ईडीने याबाबत कोर्टात दाद मागितल्यानंतर आता केजरीवाल यांचा थोडा सूर मवाळ झाला आहे. केजरीवाल यांनी ईडीला उत्तर देण्यासाठी तयारी दाखवली आहे. 12 मार्चनंतरची वेळ देण्यास त्यांनी सांगितलं असून ही चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा केली जाईल अशा अटीवर ते ईडी चौकशीला सामोरे जाण्यास तयार झाले आहेत.

कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल ईडी च्या रडार वर आहेत. या प्रकरणामध्ये त्यांना यापूर्वी 8 वेळा समन्स बजावण्यात आला होता. त्याही ही कारवाई राजकीय आकसातून आणि अवैधपणे केली जात असल्याचं म्हटलं आहे. आजही हा समन्स अवैध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारा ईडीच्या अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास तयार असल्याची अट ठेवत त्यांनी 12 मार्च नंतर तारीख देण्याची सूचना केली आहे.

आज 4 मार्च दिवशी केजरीवाल यांना चौकशीला सामोरे जाण्याचा समन्स होता पण त्यांनी तो अवैध असल्याचं सांगत तो मागे घेण्यास सांगितला होता. ईडी चौकशीच्या बहाण्याने अटकेची कारवाई करत आम आदमी पक्षाला संपवण्याचा मानस असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं आहे.