IPL Auction 2025 Live

Delhi Assembly Election ABP News Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक एबीपी न्यूज एक्झिट पोल लाईव्ह स्ट्रिमींग पाहा इथे

राजकीय विषयांमध्ये विशेष आवड असणाऱ्या मंडळींना हे एक्झिटपोल्सचे अंदाज फार महत्त्वाचे असतात. एक्झिट पोल्स हे अंतिम निकाल नसले तरी, एकूण कल समजण्यास त्यामुळे मदत होते. आपणही इथे एक्झिट पोल्सचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू

(Photo Credits-File Image)

Delhi Vidhan Sabha Election ABP News Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 साठी आज (8 फेब्रुवारी 2020) मतदान पार पडत आहे. इथे सत्ताधारी आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष, आणि काँग्रेस असा सामना आहे. सत्ताधारी आप आणि विरोधात असलेल्या भाजप आणि काही प्रमाणात काँग्रेस या जवळपास सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली. त्यामुळे दिल्लीकर जनता आपला कौल नेमका कोणाला देते याबाबत उत्सुकता आहे. ही उत्सुकता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस म्हणजे 11 फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार आहे. असे असले तरी मतदान संपल्याबरोबर विविध प्रसारमाध्यम समूह आणि संस्था आपापले एक्झिट पोल्स अंदाज जाहीर करतात. राजकीय विषयांमध्ये विशेष आवड असणाऱ्या मंडळींना हे एक्झिटपोल्सचे अंदाज फार महत्त्वाचे असतात. एक्झिट पोल्स हे अंतिम निकाल नसले तरी, एकूण कल समजण्यास त्यामुळे मदत होते. आपणही इथे एक्झिट पोल्सचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता.

दरम्यान, एक्जिट पोल्सचे अंदाज भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकशांप्रमाणे मतदान करण्याची वेळ संपल्यानंतच जाहीर करण्यात येतात. भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियम, अटींनुसार मतदानाची ठरवून दिलेल्यी वेळ संपण्याच्या आधी कोणत्याही प्रकारे 48 तास आगोदर एक्जिट पोल (Exit Poll), ओपिनियन पोल (Opinion Poll), पोल सर्वे (Poll Servey) आदींचे अंदाज जाहीर करता येत नाहीत. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणूक एक्झीट पोल्स अंदाज हे आज मतदान संपल्यानंतर साधारण सायंकाळी 6 ते 6.30 वाजलेनंतर प्रसिद्ध केले जाऊ शकतात. एबीपी एक्झीट पोल्स लाईव्ह स्ट्रिमींग आपण इथे पाहू शकता. (हेही वाचा, Delhi Assembly Election Aaj Tak Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक आज तक एक्झिट पोल लाईव्ह स्ट्रिमींग पाहा इथे)

एबीपी न्यूज एक्झिट पोल लाईव्ह स्ट्रिमींग पाहा इथे

प्राप्त माहितीनुसार विविध प्रसारमाध्यमसमूह आणि संस्थांनी एक्झिट पोल्स चाचण्यांद्यवारे दिल्लीतील जनतेचा कौल जाणून घेतला आहे. हा कल जाणून घेण्यासाठी या संस्थांनी विविध टीम्स तयार केल्या आहेत. दरम्यान, काही राजकीय अभ्यासकांचे म्हणणे असे की, एक्झिट पोल्स सर्वेच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जाते. या एक्झिट पोल्स मुळे जनतेला निष्पक्षपणे मतदान करता येत नाही. मतदार मतदान करताना सतत गोंधळून जातो. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतरच एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर करावे असा निवडणूक आयोगाने घालून दिलेला दंडक योग्य असल्याचे हे अभ्यासक सांगतात.