दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला बेबी मफलरमॅनला आमंत्रण
आप कडून केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बेबी मफलरमॅनला आमंत्रण देण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभेवर (Delhi Vidhansabha Elections) 'आप' (AAP) चा झेंडा रोवून अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. विधानसभेच्या 62 जागांवर विजय मिळवत आता केजरीवाल रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) रविवारी 16 फेब्रुवारी ला आपल्या सर्व कॅबिनेट मंत्रिमंडळाबरोबर शपथ घेणार आहेत.याबाबत आप कडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला अर्थातच मोठमोठ्या नेते मंडळींना आमंत्रण धाडण्यात आले आहे. या सोबतच एक वेगळा आणि खास पाहून सुद्धा केजरीवाल यांच्या आमंत्रितांच्या यादीत आहे, हा काही कोणी नेता, किंवा उद्योगपती नसून अवघ्या एका वर्षाचा चिमुकला आहे. जर का तुम्ही दिल्ली विधानसभा निकालाचे अपडेट्स पाहिले असतील तर तुमच्या लक्षात असेलच की एक छोटा मफलरमॅन केजरीवाल यांच्यासारखा लूक करून त्यांना भेटायला गेला होता.या मुलाचं गोंडस रूप आणि त्याने हुबेहूब साकारलेले केजरीवाल पाहता हा हा म्हणताच या बेबी मफलरमॅनचे फोटो व्हायरल होऊ लागले होते, यानंतर आप कडून सुद्धा केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, छोटा केजरीवाल बनून आलेल्या या चिमुकल्याचा नाव अवयान तोमर असे आहे. दिल्लीच्या निकालाच्या दिवशी सकाळीच तो लाल रंगाचे स्वेटर त्यावर मफलर, खाली खाकी पॅन्ट, डोक्यावर आपची टोपी आणि गोल चष्मा घालून तो आला होता. दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील आपच्या मुख्यालयामध्येही या छोट्या केजरीवालबरोबर फोटो काढण्यासाठी आप समर्थकांची गर्दी झाली होती. आणि आता शपथविधीला सुद्धा पुन्हा एकदा हा छोटा केजरीवाल पाहायला मिळणार आहे. अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा 16 फेब्रुवारीला रामलीला मैदानात पार पडणार; दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी तिसर्यांदा होणार विराजमान
AAP ट्विट
दरम्यान, 2015 मध्ये केजरीवाल दुसऱ्यांदा विजयी झाले होते त्यावेळी अवयानच्या मोठ्या बहिणीला केजरीवाल यांच्यासारखा पोषाख करुन आपच्या कार्यालयात गेली होती, या साऱ्यामागे त्यांची आई मीनाक्षी यांचा सहभाग आहे असे सांगण्यात समजत आहे.