Karnataka: इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल

शनिवारी एका सात वर्षाच्या मुलाचा इंजेक्शजनच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर खासगी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Injection | Pixabay.com

Karnataka: कर्नाटकातील (Karnataka) चिक्कमगलुरू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी एका सात वर्षाच्या मुलाचा इंजेक्शजनच्या ओव्हरडोजमुळे (Injection Overdose) मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर खासगी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- बिहारमधील आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा उघडकीस, मोबाइलच्या टाॅर्च लाईटमध्ये केली महिलांची प्रसूती

मिळालेल्या माहितीनुसार, सोनेश असं मृत मुलाचे नाव आहे. तो अजमपुरा गावातील केंचापूरा भागातील रहिवासी आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी आजमपूरा पोलिस ठाण्यात खासगी डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुटुंबियांनी पोलिसांना तक्रारीत म्हटले की, सोनेशला खूप ताप आला होता त्यामुळे त्याला खासगी दवाखान्यात नेले.

ओव्हरडोजमुळे मुलाचा मृत्यू 

दवाखान्यात त्याला डॉक्टर वरूण यांनी हातावर इंजेक्शन दिले आणि त्यानंतर त्याला घरी पाठवले. मात्र, सोनेशच्या हातावर फोड आला. त्यामुळे कुटुंबियांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यानंतर त्याला आई वडिलांनी शिवमोग्गा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु शुक्रवारी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला.

डॉक्टरवर कारवाई 

या घटनेची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. पोलिसांनी डॉक्टर वरुण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिस अधिक माहिती मिळत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif