आर्थिक स्थिती चांगली म्हणून मुलीला वडिलांच्या संपत्तीवरील हक्क नाकारता येणार नाही- उच्च न्यायालय
वडिलांनी कमावलेल्या संपत्तीमध्ये वाटा मिळू नये अशी मागणी एका याचिकेतून करण्यात आली आहे. मुलीची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे कारण यासाठी देण्यात आले होते.
तेलंगणा हायकोर्टाने एका याचिकेवर सुनावणी करताना महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुलीची आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून तिचा वडिलांच्या संपत्तीवरील हक्क नाकारला जाऊ शकत नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. तसेच या प्रकरणातील एका भावाने केलेली याचिका देखील फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती एम. जी. प्रियादर्शन यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. भावाने आपल्या बहिणीच्या विरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. कोर्टाने बहिणीच्या बाजूने निकाल दिला आहे. भावाना केलेल्या दाव्याला कोर्टाने चुकीचे ठरवले आहे. (हेही वाचा - Supreme Court On Homemaker Role: पगारदार कुटुंबातील सदस्याइतकीच गृहिणीची भूमिका महत्त्वाची - सर्वोच्च न्यायालय)
वडिलांनी कमावलेल्या संपत्तीमध्ये वाटा मिळू नये अशी मागणी एका याचिकेतून करण्यात आली आहे. मुलीची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे कारण यासाठी देण्यात आले होते. आर्थिक स्थिती चांगली आहे या एका कारणासाठी मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवरील दावा कोणी नाकारु शकत नाही. याचिकाकर्त्याने विरोधाभासी आणि चुकीचे दावे याचिकेमध्ये केले आहेत, असा उल्लेख हायकोर्टाने केला आहे.
महिलेच्या लग्नात मोठा खर्च करण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच लग्नात खर्च केला जरी असला तरी या कारणामुळे तिचा वडिलांच्या संपत्तीवरील दावा अमान्य करता येणार नाही, असं कोर्टाचं स्पष्ट केलं.
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2024 11:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

