IPL Auction 2025 Live

Cyclone Remal: पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकणार रेमल चक्रीवादळ; मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता-आयएमडी

या वादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) ईशान्य क्षेत्रासाठी गंभीर इशारा जारी केला आहे. चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागात अत्यंत मुसळधार पाऊस (Extremely Heavy Rains) आणेल असा अंदाज आहे.

Cyclone (Photo Credits: Pixabay)

चक्रीवादळ रेमल पश्चिम बंगालमध्ये (Cyclone Remal Set to Hit West Benga) आज (रविवार, 26 मे) धडकण्याची शक्यता आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) ईशान्य क्षेत्रासाठी गंभीर इशारा जारी केला आहे. चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागात अत्यंत मुसळधार पाऊस (Extremely Heavy Rains) आणेल असा अंदाज आहे. या वादळाचा त्रिपुरा आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये लक्षणीय परिणाम होण्याची शक्यताही आयएमडीने वर्तवली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, "उत्तर आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर 'रेमल' चक्रीवादळामुळे हवेचा दबाव तीव्र झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून विमानोड्डाणही स्थगित (Flight Suspended) करण्यात आली आहेत.

प्रति तास 135 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्याता

आयएमडीने पुढे सांगितले की, "रेमल चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत राहण्याची आणि त्याचे रुपांतर वायव्य आणि लगतच्या ईशान्य बंगालच्या उपसागरात आज म्हणजेच 26 मेच्या सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच, ते बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालचा किनारा ओलांडण्याची अपेक्षा आहे. सागर बेट आणि खेपुपारा 26 मेच्या मध्यरात्री 110-120 किमी/तास वेगाने वाऱ्यासह 135 किमी/ताशी वेगाने वारे वाहणारे तीव्र चक्री वादळ म्हणून ओळखले जाईल. (हेही वाचा, Cyclone Remal Live Tracker Map on Windy: पश्चिम बंगाल च्या किनार्‍याला मोठं चक्रीवादळ 26 मे दिवशी आदळण्याचा अंदाज; पहा रिअल टाईम स्टेटस)

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावरील 25 मे 2024 रोजी 1730 IST पर्यंत खोल दाब उत्तरेकडे 12 किमी/तास वेगाने सरकला होता आणि चक्रीवादळ 'रेमल' मध्ये तीव्र होत होता. हे वादळ 18.8°N अक्षांश आणि 89.5°E रेखांशावर केंद्रीत होते. खेपुपारा (बांगलादेश) च्या अंदाजे 360 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व, सागर बेटांच्या (पश्चिम बंगाल) 350 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि कॅनिंग (पश्चिम बंगाल) च्या 390 किमी दक्षिण-पूर्वेस होते. ).

महत्त्वाचे मुद्दे:

विमानोड्डाणास स्थगिती:

भारतीय कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने रेमाल चक्रीवादळाच्या अपेक्षित प्रभावामुळे 26 मे रोजी 1200 IST ते 27 मे रोजी 0900 IST पर्यंत 21 तासांसाठी विमानोड्डाणास स्थगिती दिल्याची घोषणा केली आहे.

कोलकाता विमानतळ प्राधिकरणाकडून निवेदन जारी

कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, "रेमाल चक्रीवादळाचा कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील प्रभावाच्या पार्श्वभूमीवर, भागधारकांसह एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत 26 मे रोजी 1200 IST ते 27 मे रोजी 0900 IST पर्यंत फ्लाइट ऑपरेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक्स पोस्ट

एनडीआरएफ प्रतिसादासाठी तयार:

एनडीआरएफचे निरीक्षक झहीर अब्बास यांनी एएनआयला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले की, एनडीआरएफ चक्रीवादळादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज आहेत. आम्ही चक्रीवादळासाठी पूर्णपणे तयार आहोत. जर चक्रीवादळ येथे धडकले, तर आमचे जवान प्रत्येक प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.. आमची टीम सुसज्ज आहे आणि वृक्षतोड किंवा पूर बचावासाठी सज्ज आहे. आम्ही त्यास सामोरे जाण्यासाठी आणि प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असेही अब्बास म्हणाले.