Cyclone Gulab Update: गुलाब चक्रीवादळ धडकणार, ओडिशा, बंगाल राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी

त्यामुळे चक्रीवादळाचा धोका विचारात घेऊन अनेक ठिकाणी यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Cyclone Yaas | (Photo Credits: Twitter/ANI)

गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) आज (रविवार, 26 सप्टेंबर) दक्षिण ओडीशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) ने वर्तवला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका विचारात घेऊन अनेक ठिकाणी यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अधिऱ्यांनी म्हटले आहे की, हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांसाठी इशारा देण्यात आला आहे. अंदाज व्यक्त केला जात आहे की, गुलाब चक्रीवादळ दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी कलिंगापटनम जवळ रविवारी सायंकाळी धडकेन. या काळात वारे प्रति तास 70 ते 80 किमी इतक्या वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

किनारपट्टीलगतच्या परिसरात चक्रीवादळ धडकणार हे गृहित धरुन यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हाच अलर्ट आता ऑरेंज अलर्टमध्ये परावर्तीत करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्टमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा अंतर्भूत असतो. तर यलो अलर्टमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाछी शक्यता असते. (हेही वाचा, Cyclone Gulab: गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात; राज्याला 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा)

दरम्यान, उत्तर -पश्चिम आणि त्याला लगत असलेल्या पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीवर डीप डिप्रेशन जवळपास पश्चिमेच्या दिशेने सरकले आहे. ज्यामुळे गुलाब चक्रीवादळ अधिक गडद झाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे चक्रिवादळ उत्तर पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगाल खाडीतून गोपालपूर जवळ सुमारे 370 किमी पूर्व दक्षिण पूर्वमध्ये केंद्रित होता.

भारतीय हवामान विभागाने शनिवारी रात्री 8.30 वाजता बुलेटीन जारी केले. यात सांगितले गेले की, डीप डिप्रेशन उत्तर-पश्चिम आणि त्याला लगत असलेल्या पश्चिम मध्य बंगालच्या खाडीच्या दिशेने वाढले. गुलाब चक्रिवादळ आता अधिक वेगवान झाले आहे. त्याला लगत पश्चिम दिशेने वाढणे आणि रविवारी सायंकाळ पर्यंत कलिंगपट्टनम आणि गोपालपूर जवळ आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

चक्रिवादळाला गुलाब (Cyclone Gulab) असे नाव देण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रिवादळ रिवारपर्यंत सक्रीय राहू शकते. त्याची तीव्रता सोमवारपर्यंत हळूहळू कमी होत जाईल.