Cyclone Asani: असानी चक्रीवादळ व्याप्ती वाढवतंय, महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये पावसाची शक्यता, तिन राज्यांना सावधानतेचा इशारा

असानी चक्रीवादळ (Cyclone Asani) उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशा राज्यांच्या किनापट्टी लगतच्या भागातून पश्चिम-मध्य आणि त्यालाच लागून असलेल्या उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीत पोहोचल्यावर उत्तर-पूर्व दिशेने सरकण्याची तसेच ओडिशा किनारपट्टीवरुन उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

Cyclone Repe | (PC - Twitter/ANI)

असानी चक्रीवादळ (Cyclone Asani) उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशा राज्यांच्या किनापट्टी लगतच्या भागातून पश्चिम-मध्य आणि त्यालाच लागून असलेल्या उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीत पोहोचल्यावर उत्तर-पूर्व दिशेने सरकण्याची तसेच ओडिशा किनारपट्टीवरुन उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील संभाव्य स्थितीबाबत हवामान विभागाकडून अद्याप कोणताही अंदाज (Weather Forecast) जाहीर करण्यात आला नाही. मात्र, सावधानतेचा इशारा देत हवामान विभागाने मच्छिमार आणि किनारपट्टीलगतच्या भागातील नागरिकाना सल्ला दिला आहे की, ते 9 मे रोजी बंगालच्या खाडीच्या मध्य भागात, 9 आणि 10 तारखेला पश्चिम मध्य बंगाल खाडीच्या आणि 10 मे ते 12 मे पर्यंत उत्तर पश्चिम खाडी भागात जाऊ नये.

हवामान विभागाने असानी चक्रीवादळाची गती आणि तीव्रतेबाबत आपला अंदाज व्यक्त करत म्हटले आहे की, चक्रीवादळ बुधवारी रौद्र रुप धारण करेन. आयएमडीचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी म्हटले आहे की, चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीच्या समांतर जाईल आणि मंगळवारी सायंकाळी पावसाचे कारण बनेल. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: वाढत्या तापमानासोबतच अवकाळ पावसाचाही फटका, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नुकसान)

पुढच्या पाच दिवसांदरम्यान पूर्वेत्तर भागात मेघगर्जनेसाह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 आणि 12 मे दरम्यान अरुणाचल प्रदेश आणि 9 ते 12 मे दरम्यान असम, मेघालय, आणि मिझोराम, त्रिपूरा आदी काळांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर 8 ते 12 मे या काळात राजस्थानमधील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उष्णतेचा कडाका जाणवेल.

आयएमडीने हवामानाबद्दल आगोदर वर्तवलेल्या अंदाजात मध्य महाराष्ट्रात 9 मे रोजी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पश्चिम मध्यप्रदेशमध्ये 9 ते 12 मे आणि दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि दक्षिण पंजाबमध्ये 10 ते 12 मे दरम्यान, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif