Crime News: अमानुषतेचा कळस! 57 वर्षीय नराधमाकडून आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
विशेष म्हणजे चिमुकलीवर अत्याचार करणारा हा कुणी अनोळखी नसुन चिमुकलीच्या वडिलांचा मित्र होता.
दिवसेनदिवस देशात गुन्हेगारी प्रवृत्तीची संख्या वाढतच आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना हल्ली रोज कानावर पडतात. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोयडा परिसरातून अशीचं धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आठ वर्षांच्या चिमुकलीवर ५७ वर्षिय नराधमाकडून अत्याचार करण्यात आले. विशेष म्हणजे चिमुकलीवर अत्याचार करणारा हा कुणी अनोळखी नसुन चिमुकलीच्या वडिलंचा मित्र होता. पिडीत चिमुकलेचे वडील आणि आरोपी हे दोघेही सोबत इलेक्ट्रीशिअनचं काम करतात. त्यामुळे दोघांचंही एकमेकांच्या घरी चांगलं येणं जाणं होतं. आरोपी देखील चिमुकलीस ओळखत होता. चिमुकलीच्या आई-वडीलांनी काही दिवसांपूर्वी घर बदलवण्याचे ठरवले. घर बदलता दरम्यान पती-पत्नी दोघंही व्यस्त असतील आणि चिमुकलीकडे दुर्लक्ष होईल म्हणुन दामपत्याने आपल्या लेकीस मित्राकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. तर घरबदली दरम्यान वडील आपल्या चिमुकलीस सोडून आलेत.
दरम्यान आरोपीने चिमुकलीस सोयसायटीच्या क्लब हाऊसमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केलेत. घर बदलवल्यानंतर चिमुकलीचे वडील मित्राच्या घरी घ्यायला आले आणि लेकीस घरी घेवून गेले. घरी गेल्या नंतर चिमुकलीने आपल्या आईवडिलांना काहीही सांगितले नाही. पण लेक भेदरलेली दिसल्याने आईने तिला विचारपूस केल्यावर चिमुकलीने आईला सगळा प्रकार सांगितला. तोच पालक चिमुकलीस दवाखाण्यात घेवून गेलेत. तेथे डॉक्टरांनी चिमुकलीवर अत्याचार झाल्याची खात्री केली. (हे ही वाचा:- Shraddha Walkar Murder Case: त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्यांचे 70 तुकडे करू; आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला; Watch Video)
तोच पालकांनी पोलिस स्थानकात (Police Station) धाव घेतली. संबंधीत प्रकार पोलिसांना कळताच पोलिसांनी आरोपीचं घर गाठत त्याला ताब्यात घेतल. सुरुवातील आरोपीने या सगळ्या घटनेबाबत नकार दिला पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्या नंतर अखेर आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. नोयडा पोलिस (Noida Police) संबंधीत प्रकरणाची चौकशी करत असुन चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.