Mock Drill In India: आज देशभरात होणार कोव्हिड19 मॉक ड्रिल, जाणून घ्या मॉक ड्रिल म्हणजे काय?

पण मॉक ड्रिल म्हणजे नेमक काय तर याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Photo Credits: ANI

जगातील विविध देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्याचं चित्र आहे. चीन, अमेरीका, दक्षिण कोरीया सारख्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढतचं चाल्ली आहे. तरी आता भारतात देखील कोरोनाचा नवा व्हेरियंट बीएफ७ चा प्रसार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंध धोका लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य सरकारसह देशातील नागरिकांसाठी विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता प्राथमिक स्तरावर काळाजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. किंबहुना सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळाणे ही प्राथमिक खबरदारी नागरिकांकडून घेतल्या जाणं अपेक्षित आहे. तरी कोव्हिडच्या नव्या व्हेरिऐंटचा वाढता धोका लक्षात घेता आज देशभरात केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे मॉक ड्रिल मोहिम राबवण्यात येणार आहे.

 

देशभरात आज मॉक ड्रिल होणार या संबंधित माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. पण मॉक ड्रिल म्हणजे नेमक काय तर प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांची संख्या, आयसोलेशन बेडची क्षमता, ऑक्सिजन-समर्थित बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर-समर्थित बेड, आणि डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स, आयुष डॉक्टर्स या संबिधीचा आढावा घेणे म्हणजे मॉक ड्रिल. देशात पुन्हा एकदा कोव्हिडचा नवा व्हेरिऐंट तोंड वर काढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याच पार्श्वभुमिवर आपली आरोग्यसेवा किती मजबूत आहे ह्याची पडताळणी करण्यासाठी आज देशभरात मॉक ड्रिल राबवण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- Coronavirus in India: परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळून येत आहेत कोरोना संक्रमित रुग्ण; आज दिल्लीत 4 तर कोलकात्यात 2 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह)

 

या मॉक ड्रिल मध्ये इस्पितळातील रुग्णवाहिकांची संख्या, चाचणी उपकरणे आणि अभिकर्मक आणि आवश्यक औषधे, तसेच गंभीर प्रकरणांसाठी व्हेंटिलेटरी व्यवस्थापनाचे प्रोटोकॉल या सर्व बाबी तपासण्यात येईल. तसेच कुठे काहीही कमतरता आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई करत लवकरत लवकर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचं काम या मॉक ड्रिल द्वारे केल्या जाणार आहे.