Covaxin Update: Bharat Biotech ची कोविड 19 वरील संभाव्य लस 2021च्या दुसर्‍या तिमाही मध्ये लॉन्च होण्याची शक्यता

कोवॅक्सिन लस बद्दल चाचण्यांचा अहवाल दिल्यानंतर त्याची सुरक्षितता, परिणामकारकता पाहून सरकारी मंजुरी मिळाल्यास ही लस 2021 च्या दुसर्‍या तिमाहीमध्ये उपलब्ध होऊ शकते.' अशी माहिती भारत बायोटेकचे साई प्रसाद यांनी दिली आहे.

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

भारतीय बनावटीची पहिली कोविड 19 वरील संभाव्य लस Covaxin बद्दल आज महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या लसीची निर्मिती करणार्‍या भारत बायोटेकने Covaxin लस 2021 च्या दुसर्‍या तिमाहीमध्ये बाजारात येऊ शकते असा दावा केल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. 'कोवॅक्सिन लस बद्दल चाचण्यांचा अहवाल दिल्यानंतर त्याची सुरक्षितता, परिणामकारकता पाहून सरकारी मंजुरी मिळाल्यास ही लस 2021 च्या दुसर्‍या तिमाहीमध्ये उपलब्ध होऊ शकते.' अशी माहिती भारत बायोटेकचे साई प्रसाद यांनी दिली आहे. Covid-19 Vaccine Availability: कोविड-19 वरील कोविशिल्ड लस कधी उपलब्ध होणार? SII चे CEO अदार पूनावाला यांनी दिले 'हे' उत्तर.  

हैदराबाद स्थित भारत बायोटेकला सध्या सरकारकडून तिसर्‍या आणि मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्याला परवानगी मिळाली आहे. या चाचण्या देशात 13-14 राज्यांमधील होतील. यामध्ये स्वयंसेवकांना 2 डोस दिले जातील. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अंदाजे 2 हजार जणांनी नाव नोंदणी केली आहे. आता नोव्हेंबर महिन्यात या चाचण्यांना सुरूवात केली जाईल त्यासाठी भारत बायोटेकदेखील कामाला लागली आहे. फेज 3 चे अंतरिम निकाल एप्रिल किंवा मे 2021 च्या सुमारास हाती येऊ शकतात.

Covaxin ही लस भारतामध्ये Bharat Biotech कंपनीने आणि Indian Council of Medical Research ने एकत्र येत बनवली आहे. कोवॅक्सिनचे आतापर्यंतचे अहवाल दिलासादायक आहेत. त्याचे गंभीर दुष्परिणाम नाहीत तसेच शरीरात अ‍ॅन्टिबॉडिज निर्माण होण्यास मदत होत आहे. रूग्नाच्या शरीरात उत्तम रोग प्रतिकारशक्ती देखील निर्माण होत असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे या लसीकडून भारतीयांना, आरोग्ययंत्रणेला आणि सरकारलाही अपेक्षा आहेत.

कोवॅक्सिन 60% परिणामकारक ठरू शकते. त्यासाठी आता भारतामध्ये या लसीच्या मानवी चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यातील अहवाल एप्रिल मे 2021 पर्यंत हाती येऊ शकतात त्यानंतर परिणामकतेबद्दल अधिक स्पष्टता येईल. तसेच ही चाचणी हजारो लोकांवर आणि मोठ्या प्रमाणात भारतभर होणार आहे.