दिल्ली: स्वार्थासाठी जोडप्याकडून निष्पाप उबर ड्रायव्हरची हत्या; मृतदेहाचे तुकडे नाल्यात फेकले

उबर, ओला या टॅक्सी सेवा नागरिकांच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आल्या असल्या तरी यातून सध्या अनेक गुन्हे समोर येत आहे.

Uber | Representational Image | (Photo Credits: ANI)

उबर, ओला या टॅक्सी सेवा नागरिकांच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आल्या असल्या तरी यातून सध्या अनेक गुन्हे समोर येत आहे. कधी ड्रायव्हरकडून होणारी फसवणूक, विनयभंग, अत्याचार तर कधी प्रवाशांकडून होणारी गैरवर्तवणूक, गुन्हे अशा धक्कादायक घटना अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. दिल्लीतून अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

दिल्लीतील एका जोडप्याने उबर चालकाची हत्या केली आहे. इतक्यावरच हे जोडपे थांबले नाही तर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करुन तो नाल्यात फेकला. राम गोविंद असे या मृत उबर चालकाचे नाव आहे. गोविंदची टॅक्सी पळवून ती विकण्याचा या जोडप्याचा मानस होता. त्यासाठी त्यांनी गोविंदच्या हत्येचा कट रचला. (कारचालकाचा अपमान करणाऱ्या ग्राहकाला उबर करणार ब्लॉक; अॅपमध्ये केले 'हे' महत्त्वाचे बदल)

दिल्लीत राहणारा हा उबर ड्रायव्हर काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आठवड्याभरातच गाझियाबाद येथून आरोपी जोडप्याला अटक केली. 29 जानेवारीला आरोपी जोडपे फरहात अली (34) आणि सीमा शर्मा (30) यांनी गोविंदची कॅब बुक केली. गाझियाबाद येथील त्यांच्या घरी पोहचल्यावर या जोडप्याने गोविंदला आपल्या घरी नेले आणि चहा घेण्याचा आग्रह केला. चहात गुंगीचे औषधं मिसळले असल्याने गोविंद बेशुद्ध झाला. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन नाल्यात फेकण्यात आले. दरम्यान गाडी मोरादाबाद येथील मंदिराजवळ लपवून ठेवली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif