Coronavirus Update: कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत भारताने चीनला टाकले मागे; देशात 7466 नव्या प्रकरणांसह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,65,799 वर
ज्या चीन मधून कोरोनाचा उद्रेक सुरु झाला तिथे आजवर कोरोनाचे 82 हजार 995 रुग्ण आढळले आहेत तर त्यातील 4 हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात सध्या 1 लाख 65 हजार 799 रुग्ण असून मृतांचा आकडा 4706 इतका झाला आहे.
Coronavirus Update In India: देशभरात मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 7466 नवे रुग्ण आणि 175 मृत्यू नोंदवले गेले आहेत. आजवरची ही सर्वात मोठी वाढ असून यानुसार आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,65,799 वर पोहचला आहे. आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सद्य घडीला 89987 कोरोना ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत 71105 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. दुर्दैवाने 4706 रुग्णांचा या विषाणूने जीव घेतला आहे. आजच्या या आकडेवारीनुसार आता भारताने चीन ला कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत मागे टाकले आहे. ज्या चीन मधून कोरोनाचा उद्रेक सुरु झाला तिथे आजवर कोरोनाचे 82 हजार 995 रुग्ण आढळले आहेत तर त्यातील 4 हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात सध्या 1 लाख 65 हजार 799 रुग्ण असून मृतांचा आकडा 4706 इतका झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे 59546 इतके रुग्ण असून यापैकी 38939 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजवर 18616 जणांनी कोरोनावर मात केली असून 1982 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ तामिळनाडू येथे सुद्धा कोरोनाचे 18545 रुग्ण, दिल्ली मध्ये 15257 तर गुजरात मध्ये 15195 रुग्ण आढळून आले आहेत. देशभरातील विविध राज्यात कोरोनाबाधित किती रुग्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
ANI ट्विट
दरम्यान ,भारत सध्या कोरोनाव्हायरस लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या मध्यभागी आहे हा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलून देशव्यापी लॉकडाऊनबाबत त्यांचे विचार जाणून घेतले. बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी कसे पुढे जायचे आहे याविषयी आपले मत मांडले होते यानुसार आता देशात 1 जून पासून विविध सवलती आणि नियमांसह लॉक डाऊन 5.0 सुरु होऊ शकते.