Coronavirus Update: भारतात गेल्या 24 तासात 13,940 COVID19 च्या रुग्णांची प्रकृती सुधारली, सरकारची माहिती
त्यामुळे सरकारकडून चिंता व्यक्त करण्यासोबत कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली असून गेल्या 24 तासात देशातील जवळजवळ 13,940 कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारकडून चिंता व्यक्त करण्यासोबत कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली असून गेल्या 24 तासात देशातील जवळजवळ 13,940 कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे एकूण आकडा 2,85,636 वर पोहचाल आहे. तसेच देशातील रिकव्हरी रेट आता 58.24 टक्क्यांवर पोहचल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिलकल रिसर्ज (ICMR) मध्ये गेल्या 24 तासात आणखी 11 नव्या लॅब सामील करण्यात आल्या आहेत. भारतात सध्या कोरोना व्हायरससंबंधित 1016 डायग्नोस लॅब्स आहेत. तसेच गेल्या 24 तासात 2,15.446 कोरोना व्हायरसच्या चाचण्या पार पडल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत 77, 76,228 चाचण्या पार पडल्याचे ही भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे.(Coronavirus Updates: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह, आज मिळणार डिस्चार्ज)
मागील 24 तासांत कोविड-19 (Covid-19) चे 17,296 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. तर 407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीसह भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 4,90,401 वर पोहचला आहे. त्यापैकी 1,89,463 अॅक्टीव्ह केसेस म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 2,85,637 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात एकूण 15301 रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.